परिवहन समिती निवडणूक : सेना भाजपची बाजी
 महापौरांच्या निर्णायक मताने  मनसेचा  पराभव
कल्याण : कल्याण डोंबिवली महापालिकेच्या परिवहन समितीच्या सहा सदस्यपदाची निवडणूक शुक्रवारी पार पडली. मनसे आणि भाजप मध्ये अतिशय चुरशीची लढत झाली. मनसे व भाजप उमेदवाराला समान मते मिळाली. यावेळी महापौरांचे निर्णायक मत भाजप उमेदवाराला मिळाल्याने मनसेच्या उमेदवाराचा निसटता पराभव झाला. 
कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या सहा जागांसाठी सात उमेदवार रिंगणात होते. शिवसेनेकडून सुनील खारूक, अनिल पिंगळे आणि बंडू पाटील तर भाजपकडून संजय मोरे, स्वप्नील काठे, दिनेश गोर आणि मनसेचे मिलींद म्हात्रे हे सात उमेदवार  निवडणूक रिंगणात होते. मतदान प्रक्रियेसाठी एक तासाचा कालावधी देण्यात आला होता. त्याप्रमाणे वेळेच्या १० मिनिटे अगोदरच ही मतदान प्रक्रिया पार पडली.  यावेळी मनसेचे मिलिंद म्हात्रे आणि भाजपचे दिनेश गोर यांना ९६ इतकी समसमान मते पडली. यासाठी चिट्ठी टाकून मतदान किवां बिपिएमसी अॅक्ट २ अ १९ च्या कलमानुसार पीठासीन अधिकारी यांना कास्टिंग मत म्हणजे त्यांना स्वतःचे मत देण्याचा अधिकार आहे. असे दोन पर्याय होते. त्यावर मनसेचे गटनेते मंदार हळबे आणि प्रकाश भोईर यांनी मतमोजणी परत करण्यात यावी अशी मागणी केली. त्यानुसार फेरमतमोजणी झाली. मात्र त्यानंतरही मतदानाच्या संख्येत काही फरक पडला नाही. मात्र शिवसेना व भाजप या दोन्ही गटनेत्यांनी आम्हाला पीठासीन अधिकारी जो निर्णय घेतील तो मान्य असेल असे जाहीर केले. त्याप्रमाणे पीठासीन अधिकारी तथा महापौर विनिता राणे यांनी भाजपचे सदस्य दिनेश गोर यांना मत दिल्याचे जाहीर केले.  शिवसेनेचे संख्याबळानुसार तीन सदस्य सहज निवडून आले तर भाजपच्या संख्याबळानुसार दोन सदस्य निवडून येणे गरजेचे होते तिसरा सदस्य निवडून आणण्यासाठी भाजपला शिवसेनेच्या अतिरिक्त मतांची गरज भासणार होती त्याप्रमाणेच सेनेने भाजपला मत देत युतीचे संकेत यामधून स्पष्ट दिसून आले. आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत युती करण्यावरून शिवसेना व भाजपच्या वरिष्ठ पातळीवरील नेत्यांमध्ये चांगलेच वाद सुरू असताना मात्र कल्याण डोंबिवलीत मात्र चित्र पालटल्याचे दिसून आले. काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसनेही मनसेला साथ दिली. 
(श्रुती देशपांडे – नानल, प्रतिनिधी ) 
———————
असा आहे परिवहन सदस्यांचा निकाल
शिवसेना                 एकूण मत
सुनील खारूक  –           ११२
अनिल पिंगळे    –           ९७
बंडू पाटील       –           १०६
 
भाजप
संजय मोरे  –          १०८
स्वप्नील काठे   –      १०५
दिनेश गोर    –         ९७
मनसे
मिलिंद म्हात्रे     –     ९६

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *