डोंबिवली : कल्याण-डोंबिवलीमध्ये पिण्याच्या पाण्याची भीषण समस्या उद्भवली आहे. वेगवेगळ्या भागात पाणी येत नसल्याने सणासुदीच्या काळात महिला वर्गामध्ये तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे. संतापाचा कडेलोट झालेल्या या महिलांनी कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या कार्यालयावर हंडा-कळशी मोर्चा काढून राग व्यक्त केला.
कल्याण-शिळ रोडवर असलेल्या टाटा पॉवर परिसरात नागरिकाना गेल्या अनेक वर्षांपासून पाणी टंचाईने त्रस्त आहेत. या परिसरात सुमारे ७ ते ८ हजार लोकसंख्या आहे. कमी दाबाने व अपुऱ्या पाणी पुरवठ्यामुळे या भागात पाणी समस्या निर्माण झाली आहे. पाणी टंचाईबाबत अनेकदा केडीएमसी प्रशासनाकडे तक्रारी केल्या, आंदोलने केली, मात्र आश्वसनापलीकडे काहीच कार्यवाही होत नाही. त्यामुळे संतापलेल्या नागरिकांनी महिलांनी सामाजिक संस्थांनी गुरुवारी केडीएमसी मुख्यालयावर हंडा-कळशी मोर्चा काढला. या मोर्चात हंडा आणि कळशी घेऊन महिला मोठ्या प्रमाणात सहभागी झाल्या होत्या. आठ दिवसांत समस्या सुटली नाहीतर उग्र आंदोलन करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला.
डोंबिवलीच्या सांगाव, सांगर्ली, पाथर्ली, रिजन्सी अनंतम् आणि इतर काही भागाची झाली आहे. पाणीच येत नसल्याने अखेर माजी नगरसेविका डॉ. सुनीता पाटील यांच्या नेतृत्वाखाली महिलांनी पाण्यासाठी मोर्चा काढला. गेल्या सात-आठ महिन्यांपासून पाण्याची भीषण समस्या आहे. जे काही पाणी येते गढूळ येत असल्याचे महिलांचे म्हणणे आहे. तर केडीएमसीचे अधिकारी आणि ठेकेदार गांभीर्याने लक्ष देत नाहीत. कसलेही नियोजन नसल्याने ही समस्या उद्भवली आहे. त्यामुळे ऐन सणासुदीच्या दिवसांत पाणी मिळत नसल्याने महिलांना मोर्चा काढवा लागला