महिला नगरसेविकांना महापालिकेत वाटतय असुरक्षित
त्या कर्मचाऱ्याला बडतर्फ करण्याची मागणी
कल्याण, प्रतिनिधी : लाच म्हणून ३० वर्षीय महिलेकडे शरीर सुखाची मागणी करणाऱ्या कल्याण डोबिंवली महानगर पालिकेचा लिपिक रमेशचंद्र लक्ष्मण राजपूत याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गुरुवारी अटक केली. याच घटनेचे पडसाद शनिवारी पार पडलेल्या स्थायी समितीच्या बैठकीत उमटले. महिला नगरसेविकांनी सांगितले की अशा घटना घडत असतील तर ही महापालिका महिलांसाठी असुरक्षित वाटू लागली आहे.
महापालिकेची स्थायी समितीच्या बैठकीत आयत्यावेळचा विषय म्हणून शिवसेनेचे जेष्ठ नगरसेवक आणि स्थायी समिती सदस्य वामन म्हात्रे यांनी आयत्या वेळचा विषय म्हणून त्यांनी सांगितले की, केडीएमसी चे अधिकारीवर्ग जर अशा प्रकारच वर्तन करत असतील तर अशा लोकांना निलंबित करावे अशी मागणी त्यांनी केली यावेळी महिला सदस्या कस्तुरी देसाई, शालिनी वायले याही म्हणाल्या की अधिकारी मंडळी जर अशी वागत असतील तर आम्हालाही केडीएमसी मध्ये वावरताना असुरक्षित वाटू लागले आहे. आम्हालाही इकडे महिला सुरक्षा रक्षक सुरक्षेसाठी द्यावेत. आणि अशा कर्मचाऱ्यांना काही काळासाठी निलंबित न करता त्यांना बडतर्फ करण्यात यावे अशी मागणी या सदस्यांनी केली. आम्ही महिला नगरसेविका एकट्या येतो आणि जातो आमच्या बरोबर कोणी सुरक्षारक्षक नसतात. त्यामुळे आता आम्हालाही महापालिका असुरक्षित वाटू लागली आहे. यावर स्थायी समिती सभापती दिपेश म्हात्रे यांनीही सदर कार्माच्र्यास बडतर्फ करण्यात यावे असे आदेश प्रशासनाला दिले. *****(श्रुती देशपांडे -नानल, प्रतिनिधी )