कल्याण डोंबिवली रिंग रूट : मनसे नेते राजू पाटील यांनी वेधलं पालिका आयुक्तांच लक्ष..
डोंबिवली : कल्याण डोंबिवली रिंग रूट रस्त्यात बाधित होणारी जमिन संपादित करतेवेळी अनेक महत्त्वाच्या बाबीकडे मनसेचे नेते प्रमोद (राजू) पाटील यांनी महापालिका आयुक्त पी वेलारासु यांचे एका निवेदनाद्वारे लक्ष वेधलय.
कल्याण डोंबिवली महापालिका व मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण यांच्या संयुक्तवतीने ३० मी व ४५ मी रुंद रिंग रूट (बाह्य वळण रस्ता ) प्रस्तावित आहे. जवळपास २६ गावातून हा रिंगरुट जाणार असून, या गावातील जमीन बाधित होणार आहे. मात्र रस्त्यामध्ये बाधित होणारे क्षेत्र टीडीआर माध्यमातून संपादित केले जाणार आहे. त्यामुळे मुख्य चार बाबीचा विचार करून प्रशासनाने कार्यवाही करावी याकडे पाटिल यांनी आयुक्तांचे लक्ष वेधलंय.
या आहेत चार बाबी ..
१) रिंग रूट रस्त्यात डोंबिवली विभागातील सर्व्हे नंबर, हिस्सा नंबर जाहीर केले नाही ते करण्यात यावे.
२) तत्कालीन आयुक्त ई. रवींद्रन यांनी निश्चित केल्याप्रमाणे ज्या ज्या प्रभागातून रिंगरुट रस्ता जात आहे त्या त्या प्रभागात या विषयातील जाणकार अधिकारी व कर्मचारी एक खिडकी योजनेअंतर्गत नियुक्त करावेत, जेणे करून नागरिकांना सोयीचे होणार आहे.
३) जमीन संपादित करताना बाधित जमिनीचा सात बारा अन्य व्यक्तीच्या नावावर, अथवा वर्षानुवर्षे जमीन कब्जेवहिवात दुसऱ्या व्यक्तीच्या नावावर असल्याची समस्या उदभवण्याची शक्यता आहे. अश्यावेळी या गोष्टीकडे लक्ष करून सुवर्णमध्य काढावा तो पर्यंत पत्र देण्यात येऊ नये.
ही गावे बाधित ..
माणगाव, सांगाव, हेदूटणे, घारीवली, भोपर, आयरे, कोपर, जुनी डोंबिवली, ठाकुर्ली, गावदेवी, शिवाजी नगर, चोळे, कांचनगाव, कचोरे, कल्याण, वाडेघर, उंबर्डे, कोलीवली, गांधारे, बारावे, वडवली, अटाळी, आंबिवली, बल्यानी, मांडा व टिटवाळा ही गावे बाधित होणार आहेत.