डोंबिवली, दि, २१ :  कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रामध्ये सामुदायिक व सार्वजनिक शौचालयांच्या सुमारे ४ हजार ७३९ सीट्स आहेत. सदर शौचालय साफसफाई यांत्रिकी पध्दतीने करणे प्रशासनाच्या विचाराधीन होते. याकरीता आवश्यक यांत्रिकी उपकरणांचा अभ्यास करुन १० प्रभागक्षेत्राकरीता स्वतंत्र ई-निविदा प्रसिध्द करण्यात आली. त्यामध्ये अ, ब, क व जे या चार प्रभागक्षेत्रांच्या निविदा अंतिम करण्यात येऊन, संबंधित कंत्राटदार कार्यादेश देण्यात आलेले आहेत, तसेच उर्वरीत ६ प्रभागक्षेत्रांच्या निविदा अंतिम झालेल्या असून, लवकरच कार्यादेश देण्यात येणार आहे.

या कामामध्ये महापालिका क्षेत्रातील सर्व सामुदायिक व सार्वजनिक शौचालयांची दिवसातून दोन वेळा हाय प्रेशर मल्टीजेट वाहनांद्वारे साफसफाई अंर्तभूत आहे. सदर साफसफाई आवश्यक फिनाईल, केमिकल्स इ. व्दारे करण्यात येणार असून, शौचालय व आजूबाजूचा परीसर दुर्गंधीमुक्त करण्यासाठी डिओडरंटचा वापर करण्यात येणार आहे. सदर कामामुळे सफाई कर्मचा-यांचे आरोग्य चांगले राहण्यास मदत होईल. तसेच मॅन्युअल स्कॅव्हेजींगच्या कलमांचे देखील पालन होईल. महापालिका आयुक्त डॉ.इंदुराणी जाखड यांच्या निर्देशानुसार सदर कामामध्ये महिला बचत गटांचा देखील समावेश असणार आहे. शौचालय साफसफाई यांत्रिकी पध्दतीने करण्याच्या प्रक्रियेस महापालिकेमध्ये शुभारंभ झालेला आहे.
——-

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *