कल्याण/ प्रतिनिधी : -कल्याण डोंबिवली महापालिकेने कोरोनाशी सामना करण्याकरीता नर्स व डॉक्टरांची भरती सुरु केली आहे. मात्र नॅशनल अर्बन हेल्थ मिशन अंतर्गत कार्यरत असलेल्या नर्स, वैद्यकीय सेवेशी संबधित तंत्रज्ञ अशा १९२ जणांना अत्यंत कमी वेतनावर 2015 पासून राबवून घेतले जात आहे. कोविड काळात सेवा देऊनही पुरेशा सोयी सुविधा दिल्या जात नसल्याने आज सगळ्य़ा नर्स महापालिका मुख्यालयात जमल्या होत्या. त्यांनी महापालिका प्रशासनाच्या विरोधात तीव्र संताप व्यक्त करीत ठियया आंदोलन केले. केडीएमसीने आम्हाला वाऱ्यावर सोडल्याचा आरोप आंदोलनकत्यांनी केला आहे.
कोविडशी मुकाबला करण्यासाठी महापालिका प्रशासनाने नर्स, तंत्रज्ञ, वार्डबॉय, डॉक्टरची भरती सुरु केली. उद्या या नर्स भरतीची तिसरी फेरी आहे. डॉक्टरांना तर 65 हजारापासून 2 लाखार्पयत पगार देण्याची हमी दिली आहे. तसेच कोविड काळा पुरती करण्यात येणा:या नर्सला 17 ते 30 हजार रुपये दरम्यान पगार दिला जाणार आहे. मात्र मिशन अंतर्गत 192 जण काम करीत आहे. त्यांना केवळ साडेआठ हजार रूपयांवर काम करीत आहेत त्यामुळे त्यांच्यात तीव्र नाराजी आहे.