कल्याण,/ प्रतिनिधी :  कल्याण डोंबिवली महापालिकेतील लाखो रुपयांच्या जलवाहिनी घोटाळा प्रकरणात नगरसेवक, अधिकारी कर्मचारी आणि ठेकेदार यांनी तुरुंगात  पाठवणारे शिवसेनेचे माजी  स्थायी समिती सभापती वामन सखाराम म्हात्रे यांनी आता पालिकेतील टक्केवारीच्या कारभारावर लक्ष केंद्रित केले आहे. पालिकेत गेल्या दहा वर्षात हजारो कोटींची कामे झाले असून, यामध्ये टक्केवारीच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार केल्याचा आरोप वजा तक्रार  वामन म्हात्रे यांनी पालिका आयुक्त यांच्याकडे केली आहे. याप्रकरणी सखोल चौकशी करून  गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे त्यामुळे  म्हात्रे यांच्या नव्या मागणीमुळे प्रशासनात खळबळ उडाली आहे
 
माजी ज्येष्ठ नगरसेवक वामन म्हात्रे यांनी सांगितले की महापालिकेत 2010 पासून ते 2020 पर्यंत भांडवली खर्चातून 34 हजार कोटीची विकास कामे झालेली आहेत. त्यामध्ये दहा टक्के सिंधी कॅट ( कट मनी) आणि अधिकाऱ्यांचे असे 33 टक्के टक्केवारी मध्ये गेले आहेत  त्यामुळे महापालिकेचा विकास होण्याऐवजी पालिका अधिकारी आणि ठेकेदारांचा लाखो रुपयांचा फायदा झालेला आहे. याप्रकरणी  ठेकेदार आणि अधिकाऱ्यांची आर्थिक गुन्हे शाखेकडे चौकशी लावावी तसेच अधिकाऱ्यांच्या  मालमत्ते संबंधी पोलीस महासंचालकाकडे चौकशी लावावी अशी मागणी  माजी नगरसेवक वामन म्हात्रे यांनी पालिका आयुक्तांकडे केली आहे. 
भ्रष्टाचारी अधिकाऱ्यांना जबाबदारी सोपवू नये
 
 
तसेच ज्या अधिकाऱ्यांना भ्रष्टाचार प्रकरणी अँटी करप्शन विभागाने अटक केली आहे.  त्या अधिकाऱ्यांवर  कोणतीही जबाबदारी सोपवू नये याकडेही म्हात्रे यांनी पालिका आयुक्तांचे लक्ष वेधले आहे झाले.
माझ्या आणि कुटुंबियांच्या जीवाला धोका …..
गेल्या अनेक वर्षापासून पालिकेतील कष्टाचारावर वारंवारपणे आवाज असल्याने माझ्या तसेच कुटुंबीयांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे
त्यामुळे माझ्या विरोधात खोटी माहिती पुरवण्याचा प्रयत्न केला जात आहे तरी कोणतीही माहिती आल्यास माझी व माझ्या कुटुंबीयांची कुटुंबीयांना बाजू मांडण्याची संधी द्यावी अशी विनंती ही ज्येष्ठ नगरसेवक वामन म्हात्रे यांनी पालिका आयुक्तांकडे केली आहे
माझ्या आणि कुटुंबियांच्या जीवाला धोका ..
तसेच पलिके तसेच पालिकेतील भ्रष्टाचार प्रकरणी वारंवार आवाज घेत असल्याने माझ्या विरोधात खोटी माहिती  पुरवली जात आहे. मी माझ्या कुटुंबीयांचा जीव धोक्यात घालून हे काम करीत आहे त्यामुळे माझ्या विरोधात कोणीही कुठलीही तक्रार केली तर मला माझ्या कुटुंबीयांना बाजू मांडण्याची संधी द्यावी याकडेही  म्हात्रे यांनी पालिका आयुक्तांचे लक्ष वेधलंय 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!