सिटीझन जर्नलिस्टच्या बातमीची आयुक्तांकडून दखल

कल्याण : विकास आराखडयानुसार असलेल्या एकुण १२१२ आरक्षणांपैकी महापालिकेच्या ताब्यात आलेल्या ५१३ आरक्षणांची पाहणी करुन त्यावरील अतिक्रमणे दूर करावीत तसेच सदर आरक्षित भूखंडांवर एनजीओच्या मदतीने वृक्ष लागवड करावी, असेही निर्देश पालिका आयुक्त डॉ विजय सूर्यवंशी यांनी दिले आहेत महापालिकेच्या आरक्षीत भूखंड गिळंकृत अशा आशयाची सिटीझन जर्नलिस्टने प्रकाशीत केली होती

महापालका आयुक्त डॉ सूर्यवंशी यांनी आढावा बैठक घेतली त्यावेळी पालिका अधिका-यांना त्यांनी निर्देश दिले कोविडच्या संभाव्य तिस-या लाटेचा धोका लक्षात घेता घराबाहेर सार्वजनिक ठिकाणी फिरतांना कोविड नियमांचे पालन करणे अत्यावश्यक आहे. असे असतांनाही सदयस्थितीत अनेक नागरिक मास्क परिधान न करता सार्वजनिक ठिकाणी फिरतांना निदर्शनास येत आहेत. त्यामुळे मास्क परिधान न करणा-या नागरिकांवर दंडात्मक कारवाई करण्याचे निर्देशही आयुक्तांनी दिले आहेत. सहा आयुक्तांनी आपापल्या प्रभागात समक्ष पाहणी करुन पोलिस पथकाच्या मदतीने मास्क परिधान न करणा-या नागरिकांवर यापुढे कारवाई सुरू ठेवावी, अशा सुचना आयुक्तांनी या बैठकीत दिल्या.

डोंबिवलीत भूमाफियांकडून आरक्षीत भूखंड गिळंकृत !

फूटपाथवरील अडवणा-या दुकानदारांवर कारवाई करा
तसेच दुकानदार फुटपाथवर दुकानाचे सामान किंवा नावाचे बोर्ड ठेवतात अशा दुकानांना दंड करणे, नागरिकांना फुटपाथवरुन मोकळे पणाने चालता यावे याकरिता फुटपाथवरील अतिक्रमणे हठविणे, अनधिकृत फेरीवाल्यांविरुद्ध मोहीम तीव्र पणे राबिवणेबाबत तसेच गार्बेज व्हर्नलेबल पॉईंट्स कमी करणे याबाबत संबधित उपायुक्तांना त्यांनी सूचना केल्या.

महापालिका क्षेत्रातील चाळी व तत्सम परिसरातील नागरिक मोठया प्रमाणात सार्वजनिक शौचालयांचा वापर करतात. या नागरिकांच्या सोयीसाठी सर्व सार्वजनिक शौचालये प्राधान्याने दुरुस्त करावीत, अशाही सुचना आयुक्तांनी या बैठकीत संबंधित अधिका-यांना दिल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!