कल्याण डोंबिवलीत शिवसेनेला हादरा : महापौर राजेंद्र देवळेकर यांचे नगरसेवकपद रद्द
कल्याण : कल्याण डोंबिवली महापालिकेचे महापौर राजेंद्र देवळेकर यांचे नगरसेवकपद रद्द करण्यात आलय. महापौर देवळेकर यांनी दोन निवडणुकीत वेगवेगळी जात प्रमाणपत्र सादर केल्यानेच कल्याण न्यायालयाने त्यांचे जात प्रमाणपत्र अवैध ठरवलय. या निर्णयामुळे कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेला हादरा बसलाय. कल्याण न्यायालयानं महापौर देवळेकर यांना उच्च न्यायालयात अपील करण्यासाठी एक महिन्याची मुदत देण्यात आलीय. देवळेकर यांच्या जातप्रमाणपत्राविरोधात प्रतिस्पर्धी उमेदवार भोईर यांनी कल्याण न्यायलयात धाव घेतली हेाती. त्याची सुनावणी सुरू होती. त्यावेळी हा निर्णय देण्यात आलाय. निकालानंतर महापैार देवळेकर म्हणाले की, उच्च न्यायालयात अपील करेपर्यंत या निर्णयाला स्थगिती दिली आहे. उच्च न्यायालयात मला स्थगिती मिळेल असा विश्वास देवळेकर यांनी व्यक्त केलाय.