केडीएमसी अधिका-यांवर १५ दिवसांत कारवाईचे नगरविकास राज्यमंत्राचे संकेत
मैदानात प्रेक्षक गॅलरीचे बेकायदेशीर बांधकाम प्रकरण :
नागपूर : कल्याणातील राजश्री शाहू महाराज मैदानात महापालिकेकडून दुस-या प्रेक्षक गॅलरीचे बांधकाम सुरू आहे. मात्र पालिकेच्या नगररचना विभागाची परवानगी न घेताच बेकायदेशीरपणे हे वाढीव बांधकाम करण्यात आले असेल तर संबधित अधिका-यांवर १५ दिवसात कारवाई करण्याचे संकेत नगरविकास राज्यमंत्री डॉ रणजित पाटील यांनी बुधवारी विधान परिषदेत दिले. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जगन्नाथ (आप्पा) शिंदे यांनी मैदानातील प्रेक्षक गॅलरीचा वाढीव बेकायदा बांधकामाचा तारांकित प्रश्न उपस्थित केला होता. त्या प्रश्नावर उत्तर देताना नगरविकास राज्यमंत्री बोलत होते. तसेच मैदानातील वाढीव बांधलेली दुसरी प्रेक्षक गॅलरी काढण्यात येईल असेही राज्यमंत्री पाटील यांनी यावेळी सांगितले.
केडीएमसी क्षेत्रातील आरक्षित भूखंडाचा बेकायदेशीर विकास होत असल्याचा तारांकित प्रश्न आमदार जगन्नाथ शिंदे यांनी विचारला होता. त्यावेळी मैदानातील दुस-या प्रेक्षक गॅलरीच्या वाढीव व बेकायदेशीरपणे बांधलेल्या बांधकामासंदर्भात प्रश्न उपस्थित केला होता. मैदानावरील दुस-या गॅलरीचे बांधकाम करताना नगररचना विभागाचा अभिप्राय घेण्यात आलेला नसून, या बांधकामाला स्थगिती देण्यात आल्याचे मुख्यमंख्यानी लेखी उत्तर दिले आहे. तसेच शासनाच्या अधिसुचनेनुसार १५ टक्के बांधकाम अनुज्ञेय असल्याचेही मुख्यमंत्रयानी लेखी उत्तरात म्हटले आहे. मात्र प्रेक्षक गॅलरीच्या वाढीव बांधकामाला स्थगिती देण्यात आली असली तरी महापालिकेच्या अधिका-यांनी नगररचनाची परवानगी न घेता हे बांधकाम केलय. त्यांच्यावर काय कारवाई करणार असा प्रश्न आमदार आप्पा शिंदे, निरंजन डावखरे आणि संजय दत्त यांनी उपस्थित केला हेाता. त्यावेळी राज्यमंत्री पाटील यांनी कारवाई करण्याचे संकेत दिले.
————-