अचानक पाहणी दौऱ्यातून वस्तुस्थिती उघड : आयुक्त डॉ. इंदूराणी जाखड

डोंबिवली : कल्याण-डोंबिवली महानगरपालिका हद्दीतील विविध प्रकल्प, बांधकाम, रस्ते, घनकचरा प्रकल्प, आदी कामांची पाहणी करण्यासाठी गुरुवारी आयुक्त डॉ. इंदूराणी जाखड यांनी अचानक दौरा केला. या कामाचा आढावा घेत अचानक दौऱ्यामुळे वस्तुस्थिती समोर असल्याचे डॉ. जाखड यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना सांगितले.

गुरुवारी दुपारी केडीएमसीच्या आयुक्त डॉ. जाखड यांनी विविध कामांची पाहणी केली. त्यानंतर डोंबिवली विभागीय कार्यालयात कामांबाबत बैठक पार पडली. या बैठकीला नगररचना विभागाच्या सहाय्यक संचालक  दिशा सावंत, मालमत्ता विभागाच्या उपायुक्त वंदना गुळवे, उपायुक्त अवधूत तावडे, सहाय्यक आयुक्त चंद्रकांत जगताप, कार्यकारी अभियंता मनोज सांगळे, आदि अधिकारी उपस्थित होते.
   

यावेळी प्रसार माध्यमांशी बोलताना त्या म्हणाल्या, शहरातील महत्वाचे प्रश्न सोडविण्यासाठी पालिका प्रशासन कटिबध्द आहे. नोंदणीकृत फेरीवाला संदर्भात बैठक घेतली होती. मंगळवारी महापालिका मुख्यालयात पार पडलेल्या माजी नगरसेवकांच्या बैठकीबाबत आयुक्तांनी रस्त्यांची कामे असून जो अडथळा असेल तो दूर करण्याचा प्रयत्न करू.

पश्चिम डोंबिवलीतील स्टेशन समोर असलेले मच्छी मार्केट, मोठागाव-माणकोली उड्डाणपूल, वाहतूक आराखडा, रिंगरूट व डोंबिवली पूर्वेकडील चोळगाव रस्ता, ठाकुर्ली उड्डाणपूल, 90 फिट गार्डन, केडीएमसीचे डोंबिवली विभागीय कार्यालय, आदी ठिकाणांची आयुक्त डॉ. इंदूराणी जाखड यांसह अधिकाऱ्यांनी पाहणी केली. यावेळी पश्चिमेकडील भूसंपादनाबाबतही चर्चा करण्यात आली. तर मोठागाव-मानखोली उड्डाणपुलाला जोडणाऱ्या उड्डाणपूल बाबत रेल्वे प्रशासनाने पत्र पाठविण्यात आल्याचे पाहणी दौऱ्यात सांगण्यात आले

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!