किरकोळ कामांना कात्री, मोठ्या कामांना देणार प्राधान्य

आयुक्त गोविंद बोडके यांची माहिती

कल्याण : कल्याण डोंबिवली शहरातील किरकोळ स्वरूपांच्या कामांना कात्री लावून शहरातील मोठ्या कामांना प्राधान्य देण्याचा माझा मानस आहे. तसेच आदिवासी पाड्यात मुलभूत सोयीसुविधा पुरवणे या मिशन मोड साठी पाच कोटी रुपयांची विशेष तरतूद करण्यात आली आहे. नागरिक हा केंद्रबिंदू ठेवून विकास करणार असल्याची माहिती कल्याण डोंबिवली महापालिका आयुक्त गोविंद बोडके यांनी पत्रकार परिषदेत दिली.

कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रात जी विकास कामे चालू आहेत किवा ज्या कामांचा डीपीआर अंतिम मजुरी मिळाली आहे त्या कामांना निधीची तरतूद करून ठेवली आहे. तसेच कल्याण डोंबिवली महानगर पालिकेला अजून मागील तीन वर्षातील बिले अजून आम्ही देत आहोत. कारण जेवढे उत्पन्न महापालिके कडे जमा होणे गरजेचे होते तितके झालेले नसल्याची माहिती आयुक्तांनी दिली.याशिवाय आपण मालमत्तेच्या माध्यमातून कालपर्यंत २६१ कोटी रुपयांची वसुली करण्यात आली आहे. तसेच अनधिकृत बांधकामे तोडण्यासाठी मोठा खर्च होत असून तो संबंधित बांधकाम धारकांकडूनच वसूल करणार असल्याचेही बोडके यांनी सांगितले.

१०.५१ लक्ष शिलकीचा अंदाजपत्रक

कल्याण डोंबिवली महापालिकेचा सन २०१९- २० चे रक्कम १९३७ .९९ कोटी जमेचा व १९३७. ८८ कोेटी खर्चा असलेला १० .५१ लक्ष शिलकीचा अंदाजपत्रक केडीएमसी आयुक्त गोविंद बोडके यांनी मंगळवारी स्थायी समिती सभापती दिपेश म्हात्रे यांना सादर केले.


शासन दरबारी सत्ता असूनही बेदखल : सभापतींची हतबलता

केडीएमसीच्या परिवहनचा सन २०१९- २० या १०५  कोटी ६८ लाख ३६ हजार रूपयाचा व ४ कोटी ३० लाखाचे शिलकी अंदाजपत्रक परिवहन समितीचे सभापती सुभाष म्हस्के यांनी स्थायी समिती सभापती दिपेश म्हात्रे यांना सादर केले. केडीएमटीला आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी महापालिका पदाधिकारी आणि प्रशासनाकडून दुजाभाव केला जात असल्याचा आरोप परिवहन समिती सभापती सुभाष म्हस्के यांनी केला.तसेच हा उपक्रम खासगीकरण करण्याच्या दृष्टीने धोरण निश्चिती, स्थानिक आमदार, खासदार यांच्याकडूनही दुर्लक्ष, शासन दरबारीही आमचीच सत्ता असूनही बेदखल केले जात आहे अशी नाराजी त्यांनी व्यक्त केली.  (श्रुती देशपांडे-नानल, प्रतिनिधी)

*****

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *