नावातच केवळ ‘ कल्याण ‘ ! घर घेतल्याशिवाय राहणार नाय
आमदार बच्चू कडू ने थोपटले केडीएमसी विरोधात दंड
डोंबिवली : अनोख्या आंदोलनासाठी प्रसिद्ध असणारे आमदार बच्चू कडू यांनी आता कल्याण डोंबिवली महापालिके विरोधात दंड थोपटण्याचा इशारा दिलाय. बीएसयूपीतील घरांचा प्रश्न एक महिन्यात मार्गी लावावा. अन्यथा घर घेतल्याशिवाय राहणार नाही इशारा दिलाय. नावातच केवळ कल्याण का ? असाही सवाल त्यांनी उपस्थित केला.
महापालिकेकडून बीएसयूपी योजनेतील पात्र लाभार्थीना अजूनही घराचे वाटप करण्यात आलेले नाही. त्यांच्याशी चर्चा करण्यासाठी बच्चू कडू आज कल्याणात आले होते. त्यावेळी पत्रकारांशी बोलताना त्यांनी हा इशारा दिलाय. त्यांनी महापालिका आणि सत्ताधार्यांना एक महिन्याची मुदत दिलीय. अन्यथा प्रहार संघटनेच्या मार्फत त्यांना घरे वाटप करू असेही त्यांनी स्पष्ट केलं. बच्चू कडू यांचा इशारा पालिका प्रशासन आणि सत्ताधारी किती गांभीर्याने घेतात हेच पाहावे लागणार आहे. मंत्रालयातील उंदीर घोटाळा आणि घोटाळ्यावर पत्रकारांनी विचारले असता त्यांनी सरकारवर जहरी टीका केली.