फेरीवाल्यांचे वजन काटे तोडता,  तशी अनधिकृत बांधकामे तोडा : फेरीवाल्यांचा संतप्त सवाल

कल्याण  : कल्याण डोंबिवली महापालिकेच्या अतिक्रमण पथकाची मर्दुमकी  एका व्हिडीओच्या माध्यमातून समोर आलीय, फेरीवाल्यावंर कारवाई करताना पालिकेच्या कर्मचा-यांनी त्यांचे वजन काटे जप्त केले पण हे कर्मचारी इतक्यावरच थांबले नाही तर त्यांनी फेरीवाल्यांचे वजन काटे अक्षरश: दगडाने ठेचून तोडले. डोंबिवली पश्चिमेतील ठाकूरवाडी परिसरात घडलेला हा सगळा प्रकार मोबाईल कॅमे-यात कैद झाला असूना सध्या हा व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल झाला आहे.  रस्ते अडवून बसणा-या आणि वाहतुकीला अडथळा ठरणा-या फेरीवाल्यांवर कारवाई केली पाहिजे, मात्र ज्याच्यावर त्याचं  पोट आहे, तेच तोडणे कितपत योग्य आहे ? फेरीवाल्यांचे वजन काटे जसे तोडले तसे अनधिकृत बांधकामे तोडण्याची पालिकेच्या अतिक्रमण विरोधी पथकामध्ये हिंमत आहे का ? मग तशीच अनधिकृत बांधकामे तोडा असा संतप्त सवाल फेरीवाल्यांकडून उपस्थित होत आहे. 

दोन वर्षापासून कोरोना काळात लहान मोठे व्यावसायिकाचे अक्ष​र​शः ​कंबरडे​​​​ मोडले ​आहे अनेकांवर उपासमारीची वेळ आली आहे​ कोरोना​ची​ दुसरी​ ​लाट कमी होत अस​​ताना राज्य सरकारने निर्बंध शिथिल करायला सुरवात केली​ आहे त्यामुळे सर्वांना दिलासा मिळत आहे मात्र  केडीएमसी​च्या अतिक्रमण विरोधी पथकाने​ कारवाईला सुरवात केली आहे.​ डोंबिवली पश्चिमेतील ठाकूरवाडी परिसरातील फेरीवाल्यांवर पथकाने कारवाई करीत त्यांचे वजन काटे जप्त करून दगडाने तोडून टाकण्यात आले. ​एकिकडे दुकानदारांनी संपूर्ण फुटपाथ काबीज केले आहेत​ ​ मात्र पालिका प्रशासन या दुकानदारांवर कोणतीही कारवाई करताना दिसत नाही मात्र​ दुसरीकडे​​​ फेरीवा​ल्यांवर कठोर कारवाईचा बडगा उगारला जात आहे.  ​त्यामुळे फेरीवाल्यांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.​ 

​दगड आमच्या पोटावर मारला.. ​
कोरोना नियमांचे उल्लंघन करत मोठ मोठी दुकानं सुरू असतात. मात्र त्यांच्याकडून पालिकेच्या पथकाला चिरीमिरी मिळत असल्याने त्यांच्याकडे हे कर्मचारी कानाडोळा करीत गोरगरीब फेरीवाल्यांवर कारवाई करण्यात कर्तव्यदक्षपणा समजत आहेत. दगडाने ठेचून वजन काटे​ तोडणे कितपत योग्य आहे, हा दगड त्यांनी वजन काट्यावर नाही तर आमच्या पोटावर मारला अशी उद्विग्न प्रतिक्रिया फेरीवाल्यांकडून व्यक्त होत आहे.  

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!