कल्याण : केडीएमसीत २७ गाव समाविष्ट करून नऊ वर्ष उलटले मात्र अद्याप तेथील सफाई कर्मचाऱ्यांना महापालिकेच्या सेवेत समाविष्ट करून न घेतल्याने  सफाई कामगार आक्रमक झाले आहेत. येत्या ९ ऑगस्ट रोजी काम बंद धरणे आंदोलनाचा इशारा महानगर सफाई कर्मचारी संघाने दिला आहे. त्यामुळे २७ गावातील पाणी आणि कचरा प्रश्न पेटण्याची शक्यता आहे.

 कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत 1 जून 2015 रोजी 27 गावांचा समावेश करण्यात आला . या गावात काम करणारया ग्रामपंचायतीमधील सफाई कर्मचाऱ्यांना नऊ वर्ष उलटून ही महापालिकेच्या सेवेत समाविष्ट करून घेतले नाही ..याबाबत केडीएमसीच्या सेवेत समाविष्ट करून घेण्यासाठी या कर्मचाऱ्यांचा नऊ वर्षापासून पाठपुरावा सुरू आहे . महानगर सफाई कर्मचारी संघातर्फे देखील पाठपुरावा सुरू आहे .मात्र अद्यापही या कर्मचाऱ्यांना महापालिकेच्या सेवेत समाविष्ट करून घेतले नाही .या निषेधार्थ 27 गावातील सफाई कामगारांनी येत्या  9 ऑगस्ट रोजी कामबंद धरणे आंदोलन पुकारले आहे अशी माहिती महानगर सफाई कर्मचारी संघाचे भानुदास पाटील यांनी दिली. त्यामुळे महापालिका काय भूमिका घेते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *