वनहक्क अंमलबजावणीसाठी आदिवासीची प्रांत कार्यालयावर धडक
कर्जत : आदिवासींच्या विविध मागण्यासाठी व वनक्क अमंलबजावणीसाठी जागृत कष्टकरी संघटनेच्यावतीने आज कर्जत खालापूर तालूक्यातील आदिवासीचा भव्य मोर्चा प्रांत कार्यालयावर काढण्यात आला. यावेळी सरकार विरोधी घोषणांनी कर्जत परिसर दणाणून गेला होता.
केंद्र सरकारने मंजूर केलेल्या वनहक्क कायद्यानूसार आदिवासी जमीन धारकानी सादर केलेल्या दाव्याचा निकाल तात्काळ मिळावा, जंगलांचे धिकार आदिवासींना मिळावेत आदी मागण्यात करण्यात आल्या. शहरातील आमराई मैदानातून मोर्चाला सूरूवात झाली. आंबेडकर चौक, बाजार पेठ, शिवाजी चौक मार्गे हा मोर्चा उपविभागीय आधीकारी कार्यालवर आला. या मोर्चाचे नेत्वव नँन्सीताई गायकवाड़, केशव वाघमारे, शूशीला भोई, वंसत पवार, सिता पवार यानी केले. यावेळी मोर्चेकरांनी सरकारविरोधात तीव्र घोषणाबाजी केली. “जमीन आमच्या हक्काची नाही कोणाच्या बापाची “ह्या सरकारचे करायचे काय, खाली डोके, वरती पाय ‘ अशी घोषणाबाजी सुरू होती. उपविभागीय कार्यालयाच्या मैदानावर या मोर्चाचे सभेत रूंपातर झाले. यावेळी संघटनेचे प्रतिनिधी अनिल सोनवने यांनी मोर्चेला संबोधित केले. सोनावणे म्हणाले की, दोनशे पाच वन हक्काच्या दाव्यावर प्रशासनाकडून अद्याप कार्यवाही झालेली नाही. मूळगाव येथे जिल्हा परिषद शाळेची इमारत जीर्ण झाली असून ती कधीही कोसळू शकते. नविन इमारत बांधण्यासाठी निधी उपलब्ध असूनही बांधकाम केले जात नाही. कारण इथे फक्त आदिवासी मुले शिक्षण घेतात म्हणूनच हा दुजाभाव सुरू असल्याचा आरोप त्यांनी केला. इमारत कोसळून अपघात झाल्यास त्याला प्रशासनच जबाबदार असणार आहे. तसेच तीन वर्षापूर्वी खाणीच्या वाडीचा रस्ता व्हावा यासाठी, विकासाचा दावा वनहक्क कायद्यानूसार करून देखील आद्याप पर्यत मंजूर होत नाही. संघटनेच्या उपाध्यक्षा सूशीला भोइ , हीरू निरदूडा यांनी प्रशासनाच्या कारभाराविरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली. संघटनेच्या प्रमूख प्रानँन्सी ताई गायकवाड़ म्हणाल्या की, ‘हे सरकार आदिवासीच्या जीवनाशी खेळत असून मोर्चा काढावा लागतो ही लाजीरवानी बाब आहे. आदिवासीचे जमिनीचे प्रश्न सूटत नाहीत याला प्रशासन जबाबदार असून यापुढं उग्र आंदोलन छेडण्याचा इशाराही त्यांनी दिला. यावेळी शिष्टमंडळाने प्रांताधिकारी दत्ता भडकवाड यांना निवेदन सादर केले. याबाबत लवकरच सर्व अधिका- यांची बैठक बोलावून समस्या सोडविण्याचे आश्वासन भडकवाड यांनी दिले. या वेळी गटविकास अधिकारी शबाना मोकाशी, तालूका भूमी अभीलेखाच्या अधीक्षका गंलाडे हे उपस्थित होते.