कर्जत- सीएसटी नवी लोकल : कर्जतकरांनी केले जल्लोषात स्वागत
कर्जत (राहुल देशमुख) : कर्जत ते मुंबई सीएसटी लोकल नव्याने सुरू करण्यात आल्याने कर्जतकरांनी जल्लोषात स्वागत केले. दररोज सायंकाळी ५.५६ वाजता ही लोकल कर्जतहुन सीएसटी कडे रवाना होणार आहे. कर्जत रेल्वे पॅसेंजर असोसिएशनने यासाठी रेल्वे कडे पाठपुरावा केला होता.
कर्जतहुन मुंबई कडे नोकरी व्यवसायानिमित्त जाणाऱ्या प्रवाश्याची संख्या खूप मोठी आहे. त्यामुळे कर्जत- सीएसटी नवी लोकल सुरू करण्यात यावी अशी मागणी कर्जत रेल्वे पॅसेंजर असोसिएशनने रेल्वेकडे केली होती. त्यांच्या मागणीला अखेर यश आलं युको बँकेच्या कर्जत शाखा प्रबंधक अंकिता अजित ठाकुर ह्यांच्या शुभहस्ते लोकलचे पूजन करण्यात आले. लोकलचे मोटरमन ह्यांना शाल, श्रीफळ देवुन सन्मानित केले. याप्रसंगी असोसिएशनचे कार्याध्यक्ष केतनभाई शाह, अध्यक्ष सुरेश खानविलकर, सचिव प्रभाकर गंगावणे, खजिनदार विनोद पांडे, सहखजिनदार महेंद्र आव्हाड, सदस्य गणेश म्हस्कर, जयवंत म्हसे, योगेश देशमुख, सुमेश शेट्ये तसेच कर्जत रेल्वे स्थानक प्रबंधक श्री. वर्मा, जीआरपी, आरपीएफ अधिकारी कर्मचारी, साप्ताहिक रायगडची खाणचे संपादक सुनिल दांडेकर तसेच कर्जत रेल्वे स्थानकातील प्रवेशद्वारासमोरील रीक्षा स्टँडचे रीक्षा चालक मालक उपस्थित होते.