कमला मिल अग्नितांडव : मोजो पबचा मालक युग तुली अखेर अटकेत

मुंबई : कमला मिल अग्नितांडव प्रकरणातील मुख्य आरोपी असलेला मोजो पबचा मालक युग तुली याला आज पहाटे मुंबई पोलिसांनी अटक केली. 14 जणांच्या मृत्यूला कारणीभूत ठरणाऱ्या कमला मिल आगप्रकरणात युग तुली हा प्रमुख आरोपींपैकी एक आहे.

मुंबईच्या लोअर परळ येथील कमला मिल कम्पाऊंडमधील हॉटेलला लागलेल्या भीषण आगीत 14 जणांचा होरपळून मृत्यू झाला तर अनेक जण जखमी झाले होते. 28 डिसेंबरच्या रात्री 12.30 च्या सुमारास मोजोस पबला भीषण आग लागली होती. पोलिसांनी मोजो बिस्त्रोचा दुसरा मालक युग पाठक आणि 1 अबॉव्हचे मालक क्रिपेश, जिगर संघवी आणि अभिजीत मानकर यांना अटक केली आहे. मात्र मोजोचा मालक युग तुली हा ब- याच दिवसांपासून गायब झाला होता. त्याने अटकपूर्व जामीनासाठी अर्जही केला होता. पण तो अर्ज फेटाळल्यानंतर युग तुली गायब होता. अखेर त्याने ना म जोशी मार्ग पोलिसांसमोर शरणागती पत्करली. शरण आलेल्या युग तुलीला पोलिसांनी अटक केली. आज त्याला कोर्टात हजर केलं जाणार आहे. याप्रकरणी आतापर्यंत 8 जणांना अटक करण्यात आली आहे. या सर्वांवर अनधिकृत बांधकाम, अग्निशमनचे नियम धाब्यावर बसवण्यासह अनेक आरोप आहेत.

कमला मिल आग : आठजण अटकेत
हॉटेल वन अबव्हचे कृपेश संघवी, जिगर संघवी, अभिजीत मानकर, मॅनेजर केविन केणी बावा, लिसबन स्टेनील लोपेज, आरोपींना आश्रय देणारा विशाल कारिया, मोजोसचा एक मालक युग पाठक आणि दुसरा मालक युग तुली असे अटक आरोपींची नावे आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!