कमला मिल्स अग्नितांडव : राहुल गांधींची मराठीतून ट्विट करून श्रध्दांजली
मुंबई : लेाअर परळ येथील कमला मिल्स कंपाऊंडमध्ये लागलेल्या भीषण आगीत १४ जणांना जीव गमवावा लागला आहे. या दुर्घटनेतील मृतांना सर्वच राजकीय नेत्यांनी श्रध्दांजली वाहिलीय. काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधीयांनी मराठीतून ट्विट करून श्रध्दांजली दिलीय. मुंबईमधील कमला मिल्स कंपाऊंडमध्ये भीषण आग लागून अनेकांना प्राण गमवावे लागले ही अत्यंत दुदैवी घटना आहे. पीडितांच्या कुटूंबियांच्या दु:खात मी सहभागी आहे अशा भावना व्यक्त करीत, या घटनेची त्वरीत चौकशी करून दोषींना कठोर शिक्षा पाहिजे पाहिजे असंही राहुल गांधींनी ट्विटमध्ये म्हणटलं.