डोंबिवली : अपर्णा महिला बहुद्देशीय संस्थेच्या वर्धापन दिनानिमित्त ‘मी महिला स्वाभिमानी महाराष्ट्राची’ ही राज्यस्तरीय बहुरंगी ऑनलाईन स्पर्धा आयोजित केली होती. या स्पर्धेमध्ये वेशभूषा [सन्मान स्त्री शक्तीचा] या विभागात कल्याणच्या स्वरा रिध्देश मोरे यांनी प्रथम क्रमांक पटकावला आहे. 

साहित्य सौरभ, चित्रमय महाराष्ट्र आणि वेशभूषा [सन्मान स्त्री शक्तीचा] अशा तीन विभागांत ही स्पर्धा घेण्यात आली. यापैकी कल्याणच्या स्वरा मोरे यांनी वेशभूषेच्या सन्मान स्त्री शक्तीचा या विभागातील स्पर्धेत सहभाग घेतला होता. यामध्ये स्वरा मोरे यांना प्रथम क्रमांक जाहीर झाला आहे. या स्पर्धेत सांगलीच्या हर्षदा बाबर यांनी द्वितीय, तर सांगलीच्याच सिया डिसने यांनी तृतीय क्रमांक पटकावला आहे. स्वरा मोरे यांचे सासरही सांगली जिल्ह्यातील आहे. त्यामुळे सांगली जिल्ह्यातूनही सर्व विजेत्यांवर मान्यवरांकडून कौतुकाचा वर्षाव होत आहे. विजयी स्पर्धकांना येत्या जागतिक महिला दिनी सन्मानित करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *