नागरी सोयी सुविधेसाठी कल्याणकरांचे आमरण उपोषण !
सेवा सुविधा नाही तर कर सुद्धा नाही नागरिकांचा पवित्रा..
कल्याण  : महापालिकेत भ्रष्ट आणि ढिसाळ कारभार सुरू आहे. तर दुसरीकडे महापालिकेकडून नागरिकांना कोणत्याच नागरी सुविधा मिळत नाहीत. महापालिकेचे सर्व कर भरून सुद्धा जनतेला महापालिकेकडून कोणत्याच सोयी सुविधा मिळत नाही. त्यामुळे सेवा सुविधा नाही तर कर सुद्धा नाही असा पवित्रा घेत  कल्याणातील जागरूक नागरिकांनी शुक्रवारपासून कल्याणच्या सहजानंद चौकात आमरण उपोषण छेडले आहे. या उपोषणाला नागरिकांचा चांगलाच प्रतिसाद लाभत आहे.
कल्याणातील जागरूक नागरिक श्रीनिवास घाणेकर, वैशाली परदेशी, दिपक पाटील, डॉ आनंद हर्डीकर,  उमेश बोरगावकर, सजिता नायर, वंदना सोनावणे शंकर साळवे  ही मंडळी उपोषणास बसली आहेत. यावेळी बोलताना घाणेकर यांनी सांगितले की,  महापालिकेत भ्रष्ट आणि ढिसाळ कारभार सुरू आहे. तर दुसरीकडे महापालिकेकडून नागरिकांना कोणत्याच नागरी सुविधा मिळत नाहीत. २ ऑक्टोबर २०१७ पासून नागरिकांनी सेवा नाही तर कर नाही या माध्यमातून अनेक आंदोलन केली आहेत. मूक मोर्चा, ढोल ताशा आंदोलन धरणे आंदोलन साखळी उपोषण लोकप्रतिनिधींना गुलाब पुष्प देऊन अनोखं आंदोलन असे वर्षभरापासून सनदशील मार्गाने आंदोलन केली. मात्र प्रशासनात कोणताच बदल झालेला नाही.  गढूळ पाणी रस्त्यावरील खड्डे या साध्या समस्या  पालिका सोडवू शकत नाही. पालिका आयुक्तांकडून अनेकवेळा आश्वासन दिलं जातात मात्र कोणतीच अंमलबजावणी होताना दिसत नाही.  त्यामुळे नागरिक त्रस्त झाल्याने आता आमरण उपोषणाचा मार्ग पत्करल्याचे घाणेकर यांनी सांगितले. रस्त्यावरील खड्डयांमुळे अनेकांना ५ जणांना जीव गमवावा लागला, भटक्या कु़त्रयांचा प्रश्न सतावत आहे सोयी सुविधा काहीच नाहीत मात्र कर अधिक भरावा लागतो अशी नाराजी डॉ हर्डीकर यांनी व्यक्त केली. 
**

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *