कल्याणलाही आगीची भिती, वेळीच लक्ष द्या : जागरूक नागरिकाने वेधलय लक्ष

कल्याण : मुंबईतील कमला मिल्स अग्नितांडवामुळे १४ जणांचा जीव गेला असतानाच आता लाखोंची वर्दळ असलेल्या कल्याण रेलवे स्टेशन परिसरातही यापेक्षाही वेगळी अवस्था नाहीय. कल्याण रेल्वे स्टशेन परिसरातील हॉटेल्समध्ये आगीच्या सुरक्षेच्या नियम पायदळी तुडवले जात असून एखादी दुर्घटनेची भिती आहे  त्यामुळे महापालिका प्रशासन आणि पोलिसांनी वेळीच लक्ष द्यावे याकडं कल्याणातील जागरूक नागरिक राजेंद्र रहाळकर यांनी लक्ष वेधलयं.

कल्याण शहरात पश्चिमेत स्टेशन परिसरात लाखो लोकांची वर्दळ असलेल्या भागात मोठ्या संख्येने लहान मोठे हॉटेल्स / बार आहेत. त्यांचे सिलिंडर्स किंवा स्टोव्ह , भट्ट्या ठेवण्याच्या जागाही लोकांची सतत वर्दळ असलेल्या भागातच आहे. त्यामुळे एखादी दुर्घटना घडू शकते अशी भिती रहाळकर यांनी व्यक्त केलीय. तसेच या परिसरातील अग्निशामक केंद्रही दूर हलविण्यात आले आहे. या परिसरातील अग्निशमन यंत्रणेच्या तत्परतेबाबत नियमित तपासणी व्हायला हवी. या परिसरातच असलेले अग्निशामक केंद्र आता दूर गेले आहे. त्यामुळे लाखोंची वर्दळ असलेल्या रेल्वे स्टेशन परिसरात किमान एक सुसज्ज गाडी तरी असावी अशी मागणी त्यांनी केलीय.

मुंबई मधील आगीची घटना ही दिल्लीच्या उपहार थिएटर दुर्घटनेसारखीच घटना आहे ! अनेक कॉर्पोरेट्स ऑफिसेस व त्यातही न्यूज चॅनेल्सचे ऑफिसेस असतानाही एवढ्या मोठ्या प्रमाणावर दुर्लक्ष ? बेसमेंटपासून मोठ्या प्रमाणावर कार्यालये व माणसांची वर्दळ असताना एवढे मोठे हॉटेल इमारतीच्या वरच्या मजल्यावर असणे व त्यामध्येही ” टेरेस हॉटेलसारखा ” प्रकार असणे ! हे अनाकलनीय आहे. काहीवेळा अचानक लागलेल्या आगीत भाजल्यामुळे दुर्घटना समजू शकतो पण धुरात घुसमटल्याने मृत्यू व्हावेत म्हणजेच हा निष्काळजीपणाच आहे ! त्यांना सहज , सुरक्षित बाहेर पडताच आले नाही ! हॉटेलचा मालक आणि मुंबई महापालिका दोन्ही बरोबरीने दोषी आहेत ! न्यूज चॅनेल्सच्या संबंधितांनीही तिथल्या अनधिकृत बाबींना समोर आणायला हवे होते याकडेही रहाळकर यांनी लक्ष वेधलय.

कोणती आहेत हॉटेल्स !
दीपक , सत्यश्रम , दीक्षा , ग्रेट पंजाब , रामदेव ( स्टेशन ), पंडित , बोरगावकर गल्लीत लहान 5 – 6 हॉटेल्स  तसेच , नीलम बार , कल्याण दरबार , व लगतचे  संतोष , विश्व पॅलेस , अमर पॅलेस , वैशाली  आदी हॉटेल्सचा या परिसराला गराडा आहे.

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!