कल्याणच्या श्रध्दाचाही चेंगराचेंगरीत मृत्यू
कल्याण – एल्फिस्टन व परळ स्टेशनला जोडणा-या ब्रीजवर झालेल्या चेंगराचेंगरीत २२ जणांना जीव गमवावा लागला आहे त्यात कल्याणात राहणारी श्रध्दा वरपे या २२ वर्षीय तरूणीचा समावेश आहे.
श्रद्धा ही आपल्या आई वडीलांसह कल्याण पूर्वेतील रामनगर परिसरात राहत होती. एल्फिस्टनमधील कामगार मंडळाच्या कार्यालयात ती नोकरीला होती. नेहमीप्रमाणे आपल्या कार्यालयात एल्फिस्टन ब्रिजवरुन जात असताना हा अपघात घडला. यावेळी झालेल्या चेंगराचेंगरीत तिला जीव गमवावा लागला आहे. तिच्या अकाली मृत्यूने कुटुंबियांना मानसिक धक्का बसला असून परिसरातील नागरिक शोकमग्न अवस्थेत आहेत.