कल्याणात रांगोळी स्पर्धेत २२ हजार जणांचा सहभाग
कल्याण : दिवाळी हा भारतीयांचा सर्वात मोठा आनंदाचा सण, दिवाळीत दारासमोर रांगोळी काढण्यात सर्वांना प्रचंड उत्साह असतो. दिव्यांचा हा तेजोमय उत्सव द्विगुणीत करण्यासाठी व कलाकारांच्या सुप्त गुणांना वाव देण्यासाठी कल्याणचे आमदार नरेंद्र पवार यांनी घर तिथे रांगोळी स्पर्धेचे आयोजन केले होते या स्पर्धेत तब्बल २२००० लोकांनी सहभाग दर्शविला.
ही स्पर्धा ३९ प्रभागांमध्ये ३४० ठिकाणी आयोजित करण्यात आली होती. या रांगोळी स्पर्धेत“बेटी बचाव-बेटी पढ़ाव”,“स्वच्छ भरत अभियान”, पर्यावरण, पाणी वाचवा, प्रदूषण न करण्याचा संदेश, झाडे लावा झाडे जगवा, एल्फिन्स्टन ची घटना, भारतीय वीर शहीद जवान, राष्ट्रीय एकात्मता, सर्व धर्म समभाव, अशा विषयांवर आधारित रांगोळ्या काढण्यात आल्या होत्या. यावरून त्यांची समाजाबद्दल असलेली जागरुकता यातून दिसून आली. यामध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, सहकारी संस्था, शैक्षणिक संस्थान, पतंजली, संस्कार भारती, प्रजापती ब्रम्हकुमारी, स्थानिक मंडळे, स्थानिक नागरिक इत्यादींनी सहभाग घेतला. एक प्रभागात १० ठिकाणी यातून ५ बक्षिसे देण्यात आली.परीक्षण करण्यासाठी परीक्षक रात्री १२.३० पर्यंत परीक्षण करत होते. काही दिवसांतच सर्व विजयी स्पर्धकांना बक्षिसे आणि स्पर्धकांना प्रमाणपत्र देण्यात येणार आहे अशी माहिती आमदार नरेंद्र पवार यांनी दिली.