कल्याणात भंगार दुकानातील घरगुती गॅस सिलेंडरची गळती ; आगीत ५ जण भाजले 
कल्याण  : पश्चिमेतील भेाईरवाडी परिसरातील एका भंगार दुकानात घरगुती गॅस सिलेंडरची गळती होऊन लागलेल्या आगीत पाचजण गंभीररित्या भाजल्याची घटना घडलीय. पंधरा दिवसापूर्वी इथल्या फर्निचरला आग लागली होती.काही वर्षापूर्वी डोंबिवली शीळ रस्तयावरील भंगाराच्या दुकानातील केमिकलच्या टाकीचा स्फोट होऊन तीन जणांचा बळी गेला होता. गेल्या काही वर्षात कल्याण डोंबिवली शहरात नागरी वस्तीतच अनधिकृतपणे भंगार विक्रीची दुकाने थाटली गेली आहेत. त्यामुळे वारंवार घडणा- या घटनांमुळे नागरिकांची सुरक्षितात धोक्यात आलीय. त्यामुळे अनधिकृत भंगार विक्रीच्या दुकानांवर पालिका व पोलीस कारवाई करतील का, असाच सवाल कल्याण डोंबिवलीकरांमधून उपस्थित होत आहे. 
भोईरवाडी परिसरात एकमेकांना लागून भंगार विक्रीची दुकाने आहेत. मनोज गुप्ता हा दुपारच्या सुमारास जेवण बनवीत असतानाच गॅस सिलेंडरची गळती होऊन स्फोट होऊन आग लागली. भंगाराच्या समानामुळे आग शेजारी पसरली त्यामुळे
 मनोज गुप्तासह शेजारच्या दुकानातील ४ कामगार ही भाजले.आग लागल्याचे समजताच एकच धावपळ उडाली. स्थानिकांनी अग्निशमन दलाला पाचारण केले. अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेऊन आग विझवली. पंधरा दिवसांपूर्वी इथल्या फर्निचरच्या दुकानाला आग लागली हेाती. या परिसरातील मोकळया जागांवर एकमेकांना खेटून भंगाराची दुकाने थाटली आहेत.  नागरी वस्तीतच ही दुकाने थाटण्यात आल्याने नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.
या आगीमागचं नेमकं कारण समजू शकलेलं नसले तरी गॅस सिलेंडरची गळती झाल्यानेच आग लागल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. कल्याण शीळ रस्त्यावर मोठया प्रमाणात भंगाराची दुकाने आहेत. एका  भंगाराच्या दुकानातील केमिकलच्या टाकीचा स्फोट झाल्यानंतर त्या टाकीचे झाकण रिजन्सी परिसरात उडाले होते तसेच शेजारच्या चाळीतील घरांच्या भिंती कोसळल्या होत्या व तडे गेले होते इतका मोठा स्फोट होता त्यावेळी पोलिसांकडून सर्वच भंगार विक्रेत्यांची चौकशी करण्यात आली मात्र त्यानंतर जैसे थे परिस्थिती असून त्या काळात भंगार विक्रेत्यांची दुकाने वाढली आहेत हायवेवर असणारी ही दुकाने आता नागरी वस्तीत वाढू लागल्याने नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर बनलाय.
भंगार विक्रेत्यांची पोलिसांकडून चौकशी करण्यात आली

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *