कल्याणात आघाडीचे शक्तीप्रदर्शन …
कल्याण (प्रतिनिधी) : कल्याण लोकसभा मतदार संघात आघाडीचे उमेदवार बाबाजी पाटील यांनी सोमवारी दुपारी वाजत- गाजत आपला उमेदवारी अर्ज सादर करीत भव्य शक्तीप्रदर्शन केले. कांग्रेस व राष्ट्रवादी काँगेसचे हजारो कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते. आतापर्यंत कल्याण मतदार संघातून ७ उमेदवारांनी आपले उमेदारी अर्ज सादर केले आहेत. मंगळवारी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस असल्याने महायुतीचे उमेदवार डॉ श्रीकांत शिंदे हे उमेदवारी अर्ज सादर करणाार आहेत.
डोंबिवलीच्या ग्रामीण भागातून आघाडीची भव्य रॅली निघाली होती. ढोल ताशांच्या गजरात वाजत गाजत उमेदवार पाटील हे डोंबिवलीच्या वै हभप सावळाराम महाराज म्हात्रे क्रिडासंकूलात दाखल झाले. काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसचे हजारो कार्यकर्ते यावेळी रॅलीत सहभागी झाली होती. माजी मंत्री गणेश नाईक, काँग्रेसचे नेते संतोष केणे, गंगाराम शेलार, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष रमेश हनुमंते, वंडार पाटील आदी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित हेाते. यावेळी पत्रकारांशी बोलताना गणेश नाईक यांनी भाजपवर टीका केली. गेल्या पाच वर्षात मोदी सरकारने कोणतेच विकासाचे काम केले नसून, युपीए सरकारच्या काळात अनेक विकास कामे झाली त्याचे क्रेडीट घेण्याचे काम करीत असल्याची टीका केली. कल्याण मतदार संघात मुंब्रा रेतीबंदर येथील ५० हजार लोकांना देशोधडीला लावले. कल्याण फाटा ते पत्रीपूल या रस्ता रूंदीकरणात हाॅटेल दुकान तोडून त्यांचा रोजगार हिरावून घेतला. भूमीपुत्रांच्या जमिनी हिसकावून घेण्यात आल्या. नेवाळी प्रकरणात महिलांना देान महिने जेलमध्ये राहावे लागले या सर्व प्रकारामुळे इथल्या स्थानिकांमध्ये भाजप सरकारविषयी तीव्र चीड आहे. त्याचाच फायदा आघाडीच्या उमेदवाराला मिळणार आहे. विरोधकांना धमकाविण्याची भाषा केली जात असून, रडीचा डाव सुरू आहे. इडीच्या धाडी अगोदर का टाकल्या नाहीत ? असा सवालही नाईक् यांनी उपस्थित केला. उमेदवार बाबाजी पाटील म्हणाले की, २७ गावांच्या विकासासाठी साउेसहा हजार कोटीचे पॅकेज जाहिर केले मात्र अजून साडेसहा रूपयेही आले नाहीत. २७ गावावर ३५ वर्षापासून अन्याय सुरू आहे. सुविधा न देता वंचित ठेवले आहे. नेवाळी विमानतळाला हजारो एकर जमीन देण्यात आली. या आंदोलनात स्थानिक भूमिपुत्रांना जेलमध्ये टाकण्यात आले. नवी मुंबई १४ गावांना अजूनही पिण्यास पाणी नाही. हे सर्व मुद्दे घेऊन निवडणूकीत उतररलो असून. १४० गावे व भूमिपूत्र माझया सोबत आहेत असे पाटील यांनी सांगितले. दरम्यान उमेदवारी अर्ज भरताना पत्रकारांना आत पोलिसांनी पत्रकारांना अटकाव
—————————— —
पत्रकारांना मनाई ….
उमेदवारी अर्ज भरताना फोटेा काढण्यासाठीही पोलिसांनी पत्रकारांना आत सोडण्यास मनाई केली. त्यामुळे पोलिस व पत्रकारांमध्ये वाद झाला. अखेर पोलिसांचा निषेध म्हणून पत्रकारांनी जमिनीवर ठियया आंदोलन केले. ठाणे लोकसभा मतदार संघात पत्रकारांना आतमध्ये सोडण्यात आले मग कल्याणात हा निर्णय का ? असा सवाल संजीव नाईक यांनी उपस्थित करीत पत्रकारांच्या आंदोलनात सहभागी झाले. सरकार हुकूमशाही पध्दतीने वागत असून पत्रकारांना मनाई करणे हे चुकीचे आहे अशी प्रतिक्रिया व्यक्त करीत गणेश नाईक यांनीही पत्रकारांच्या आंदेालनाला पाठींबा दिला.
———————-