कल्याण ग्रामीणमधील आडीवली गावात नागरिकांचे रस्त्यावर साचलेल्या पाण्यात बसून आंदोलन pic.twitter.com/C0jjmAZk2m
— Citizen News Marathi (@cjournalist4) July 22, 2021
कल्याण : गेल्या तीन दिवसापासून कल्याण डोंबिवलीत पावसाने जोरदार बॅटिंग केल्याने एकच दाणादाण उडवून दिली आहे . पावसामुळे कल्याण मलंग रोड वरील आडीवली गावातील रस्त्यावर गुडघाभर पाणी साचलं होतं तर काही चाळी मध्ये देखील पाणी शिरलं.आडीवली गावात नालाच नसल्याने अशी परिस्थिती उदभवत आहे, रस्त्याची दुरुस्ती होत नाही, दरवर्षी पावसाळ्यात होणाऱ्या समस्याबाबत अनेकदा तक्रारी करून देखील प्रशासन दुर्लक्ष करत असल्याने संतापलेल्या नागरिकांनी माजी नगरसेवकासह रस्त्यावर साचलेल्या पाण्यात बसून ठिय्या आंदोलन केले .यावेळी महापालिका प्रशासनाच्या विरोधात घोषणाबाजी करत पालिकेचा निषेध नोंदवण्यात आला.तसेच येत्या आठवडाभरात जर २७ गावांमधली रस्त्यासह नाल्याची काम सुरू न झाल्यास २७ गावाला जोडणारे सर्व रस्ते बंद करून रास्ता रोको करण्याचा इशारा माजी नगरसेवक कुणाल पाटील यांनी दिला
( सिटीझन न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला Facebook, Instagram, Twitter, Likdin आणि YouTube वर नक्की फॉलो करा )