कल्याणात चाकूने भोसकून इसमाकडील ३ लाख लुटले
कल्याण : कल्याण पूर्वेतील तिसगाव परिसरातील बालाजी अपार्टमेंटमध्ये राहणारे वारिजा कोटियन याना दोन अनोळखी इसमानी गाठून त्यांच्या पोटात चाकू भोसकून त्याच्याकडील 3 लाखाची रोकड लुटल्याची घटना कल्याणात घडली. या हल्ल्यात कोटीयन जखमी झाले आहेत.
सोमवारी दुपारी पुना लिंक रोड ने पायी जात असतानाच अचानक पाऊस आल्याने त्यांनी एक कोपऱ्याचा आसरा घेतला त्याववेळी दोन अनोळखी इसमानी जबरदस्तीने computer त्याच्या जवळील ३ लाख १ हजार रोकड व एक मोबाईल असलेली पिशवी हिसकावली यावेळी कोटियन यांनी विरोधात करण्याचा प्रयत्न केला असता या दोघा मधील एकाने कोटियन यांच्या पोटात चाकू भोसकून तेथून पळ काढला या प्रकरणी कोळसेवाडी पोलीस स्थानकात दोन अनोळखी इसमाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कोळसेवाडी परिसरात भुरट्या चोरट्याचा वावर वाढला असून लुटीच्या वाढत्या घटना मुळे नागरिकांमध्ये दहशतीचे वातावारण आहे मात्र हि वाढती गुन्हेगारी रोखण्यात कोळसेवाडी पोलिसांना अपयश आल्याचे वाढत्या घटना वरून दिसून येत आहे.
कामगाराच्या मृत्यू प्रकरणी मालकाविरोधात गुन्हा
कल्याण : खडकपाडा परिसरात असलेल्या एका सर्विस सेंटर वर एका कामगाराचा शॉक लागून मृत्यू झाल्याची घटना घडली होती या प्रकरणी खडकपाडा पोलिसानी सर्विस सेंटर मालकावर निष्काळजीपणाचा ठपका ठेवत गुन्हा दाखल केला आहे .पवनकुमार दुबे असे मृत कामगाराचे नाव आहे, तर सुभाष उपाध्याय असे सर्विस सेंटर मालकाचे नाव आहे . काही दिवसांपूरवी पवन कुमार दुबे हा कामगार त्यांच्या सर्विस सेंटर वर काम करत असताना इलक्ट्रिक चा शोक लागून त्यांचा मृत्यू झाला होता.