तोतया पोलीसांनी तरूणांना लुटले 

कल्याण ( आकाश गायकवाड ) : कल्याण : कल्याण डोंबिवली मध्ये वाढत असलेला भुरट्या चोरट्यांचा वावर नागरिकांसह पोलीस यंत्रणेची डोकेदुखी ठरू लागला आहे .त्यातच काल पोलीस असल्याची बतावणी करत दोन भामट्याने तिघा तरूणांकडून रोकड व मोबाईल असा मिळून २९ हजारांचा मुद्देमाल लंपास केलाय. डोंबिवली पूर्वेकडील मानपाडा परिसरात राहणारा जितेंद्र चौहान आपल्या दोन मित्रांसह दुपारी साडे बारा वाजण्याच्या सुमारास पूर्वेकडील शिवाजी चौक परिसरातील एका बँकेत जात होते . यावेळी दोन अनोळखी व्यक्तींनी त्यांना हटकले आम्ही पोलीस आहोत तुमची झडती घ्यायची आहे अशी दमबाजी करीत या तरुणांजवळील रोकड व मोबाईल हिसकवून घेत तेथून पळ काढला .या प्रकरणी मानपाडा पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आलाय.

बोगस कागदपत्राच्या आधारे फायनान्स कंपनीला गंडवले

कल्याण : एका नामांकित फायनान्स कंपनीला ग्राहकांचे बनावट कागदपत्र सादर करत तब्बल २१ लाख ३६ हजार ३५ रुपयांचे कर्ज घेवून कंपनीची फसवणूक केल्याची धक्कादायक घटना कल्याण मध्ये उघडकीस आलीय. या प्रकरणी महत्मा फुले पोलीस स्थानकात सुरेश बाबू नायर ,सुनील नायर ,प्राची मेढेकर ,संदेश साळुंखे ,अविनाश कुरतडकर या पाच जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. कल्याण पश्चिमेकडील रामबाग परिसरात असलेल्या एका नामंकित फायनन्स कंपनी मध्ये असलेल्या ८२ कर्जदारापैकी काही कर्जदारांचे बनावट कागदपत्राद्वारे बँक खाते उघडले. हे कागदपत्रे कंपनीला सादर करून त्याआधारे तब्बल २१ लाख ३६ हजार ३५ रुपयांचे कर्ज मंजूर करून घेत, या रकमेचा अपहार करण्यात आला. हा प्रकार कंपनीच्या लक्षात येताच त्यांनी महत्मा फुले पोलीस स्थानकात तक्रार दाखल करण्यात असून पाच जणांविरोधात गुन्हा करण्यात आलाय या प्रकरणात पोलीस अधिक तपास करीत आहेत.

सीमकार्डची माहिती लपवली दुकानदारावर गुन्हा दाखल

कल्याण : विक्री केलेल्या मोबाईल सिमकार्ड ची माहिती दुकानात नोंद करत ती पोलीस स्थानकाला देणे बंधनकारक असताना ती महिती पोलीसाना न दिल्याने सबंधित दुकानदारा विरोधात खडकपाडा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे . कल्याण पश्चिमेकडील मिलिंद नगर गौरी पाडा परिसरात तेजस कॉलनी अयोध्या चालीत दयाराम रोमिना याचे भूमिका मोबाईल शोप आहे .सिमकार्ड विक्री केल्या नंतर त्यांची नोड दुकानातील रजिस्टर मध्ये करत हि माहिती स्थानक पोलीस स्थानाकला देणे आवश्यक असताना त्यांनी विक्री केलेल्या सिमकार्ड ची माहिती पोलीसान न दिल्याने पोलिसांनी दुकानमालक रोमिना विरोधात गुन्हा दाखल केला आहे .

कल्याणात घरफोडी
कल्याण : कल्याण पश्चिमेकडील सहजानंद चौक महाजन वाडी वेताळ वाडी परिसरात राहणारी वनिता कवटे या मंगळवारी सकाळी राहत्या घराला कुलूप लावून बाहेर गेल्या होत्या .घराला कुलूप असल्याची संधी साधत अज्ञात चोरट्यांनी घरचे कुलूप तोडून घरातील सोन्याचे दागिने असे मिळून ४० हजारांचे दागिने लंपास केले. काही वेळाने त्या घरी परतल्यानंतर घरात चोरी झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. याप्रकरणी महत्मा फुले पोलीस स्थानकात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *