हातावर गोंदवलेल्या नावावरून हत्येचा उलगडा
कल्याण गुन्हे पोलिसांची कारवाई
कल्याण : तीन दिवसांपूर्वी दगडाने ठेचून हत्या झालेल्या एका महिलेच्या हातावर गोंदवलेल्या नावावरून त्या महिलेची ओळख पटवून, तिच्या मारेक-याला अटक करण्यात कल्याण गुन्हे शाखेच्या पोलिसांना यश आलंय. ज्ञानेश्वर पाटील अशी अटक करण्यात आलेल्या मारेक- याचे नाव आहे. अनैतिक संबधातूनच त्या महिलेची हत्या झाल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.
कल्याण पश्चिमेतील निळकंठ सृष्टीजवळील मोकळया जागेत एका महिलेची दगडाने ठेचून हत्या करण्यात आली हेाती. मात्र त्या महिलेची कोणतीही ओळख पटत नव्हती. मात्र महिलेच्या उजव्या हातावर सुनील असे नाव गोंदवलेले होते. यावरूनच पोलिसांनी तपास करून त्या महिलेचा शोध लावला. कल्याणातील सापर्डे गावातील लताबाई गवई असे त्या महिलेची ओळख पटली. त्याच गावात राहणारा ज्ञानेश्वर पाटील याचे त्या महिलेसोबत अनैतिक संबध होते. शुक्रवार ६ ऑक्टोबरला दोघेही हॉटेलमध्ये गेले होते त्याचवेळी त्यांच्यात वाद झाला होता. घरी सोडण्याच्या कारणावरून ज्ञानेश्वरने तिचा गळा आवळून व त्यानंतर दगडाने ठेचून हत्या केल्याची कबुली दिल्याचे पोलिसांनी सांगितले. कल्याण गुन्हे शाखचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजू जॉन यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक नितीन मुदगुन, पवन ठाकूर,सहाययक पेालीस उपनिरीक्षक साळुंखे, हवालदार मालशेटे निकुले रजपूत यांच्या पथकाने ही कारवाई केली.