बंटी बबलीने बिल्डरला  घातला ३० लाखाला गंडा

कल्याण :सांगली येथे राहणाऱ्या  एका दाम्पत्याने कल्याण मधील एका बांधकाम व्यावसायिकाला सहा कोटी कर्ज मंजूर करण्याचे आमिष दाखवत तब्बल ३० लाख रुपयांना गंडा घातल्याची धक्कादायक घटना उजेडात आलीय. या प्रकरणी बांधकाम व्यवसायिकाने महात्मा  फुले पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली असून, या तक्रारीनुसार पोलीसनी अंकुश कदम व पूजा कदम या दांम्पत्याविरोधात गुन्हा दाखल केलाय. .

कल्याण पश्चिमेकडील रामबाग परिसरातील एका बांधकाम व्यावसायिकाला  सांगली येथे राहणाऱ्या अंकुश कदम व पूजा कदम या दाम्पत्याने  सहा कोटी कर्ज मंजूर करून देतो असे आमिष दाखवले. तसेच  यासाठी अंकुश ने आपले नाव बदलून आपण राकेश पाटील असल्याचे  सांगितले होते . कर्जासाठी प्रोसेसिंग फी म्हणून ३० लाख रक्कम  त्यांनी घेतली हेाती .मात्र पैसे देवून तीन महिन्यांचा कालावधी लोटला असतानाही  कर्ज मंजूर न झाल्याने त्या बिल्डरने   महत्मा फुले पोलीस स्थानकात फसवणूक झाल्याची तक्रार दाखल केली त्यानुसारच पोलिसांनी हा गुन्हा दाखल केलाय.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *