क्षुल्लक कारणावरून कॉलेज तरूणावर तलवारीने वार

कल्याण :  बाईकला धक्का लागल्याच्या क्षुल्लक कारणावरून एका कॉलेजच्या तरूणावर तलवारीने वार केल्याची खळबळजनक घटना बुधवारी रात्री साडेआठच्यासुमारास कल्याणात घडली. चेतन घनसोलकर वय १७ असे कॉलेजच्या विद्याथ्र्याचे नाव आहे. गंभीररित्या जखमी झालेल्या चेतनला उपचारासाठी खासगी रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. चेतनच्या दोन्ही हाताला जबर जखम झालीय. चेतन हा कमलादेवी कॉलेजचा विद्यार्थी आहे.  चेतन हा रात्री क्लासवरून घरी येत असतानाच  मयूर गायकवाड नामक तरूणाशी त्याचा वाद झाला यावेळी मयूरने आपल्या मित्रांना बोलावून चेतनला जबर मारहाण केली व तलवारीने त्याच्यावर वार केल्याची माहिती चेतनने पोलिसांना दिलीय. याप्रकरणी पोलीस तपास करीत आहेत.

 

One thought on “क्षुल्लक कारणावरून कॉलेज तरूणावर तलवारीने वार ”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *