कल्याण कोर्टात संयुक्त जयंती साजरी

कल्याण : कल्याण क्रिमिनल कोर्ट बार असोसिएशनच्यावतीने आज डॉ बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज आणि महात्मा ज्योतिबा फुले यांची संयुक्त जयंती उत्सव साजरा करण्यात आला.  १४ एप्रिल डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त कोर्टाला सुट्टी असल्याने पूर्वसंध्येला जयंती उत्सव साजरा करण्यात आला. यावेळी डॉ बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज आणि महात्मा फुले यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून,  या सर्व महापुरूषांचा आदर्श समाजापुढे ठेवावा यावर भाषणे पार पडली. तसेच  यावेळी वकिल सदस्यांच्या मनोरंजनासाठी क्रिकेटचे सामान आणि कॅरम बोर्ड या वस्तू भेट देण्यात आल्या.

    

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *