पतीविरोधात खोटी साक्ष देणाऱ्या पत्नीला कल्याण न्यायालयाची चपराक
कल्याण :- आपल्या 12 वर्षांच्या मुलीचे अपहरण करून तिला कुंटणखाण्यात विकत असल्याचा पतीविरूद्ध खोटा आरोप करणाऱ्याला पत्नीला कल्याण न्यायालयाने चपराक लावली. पतीने दिलेल्या पुराव्यास व मुलीच्या जबाबानुसार कल्याण न्यायालयातील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी वानखेडे यांनी पत्नीची याचिका फेटाळून लावली अशी.
डोंबिवलीत राहणा-या दाम्पत्याला 12 वर्षाची मुलगी आहे. मात्र काही कारणांवरून पती पत्नीमध्ये वाद झाला होता. पतीला धडा शिकवण्याच्या हेतूने पत्नीने पतीविरोधात न्यायालयात धाव घेतली. माझे पती हे चित्रपट स्रुष्टीत काम करत असल्याने त्यांचे चारित्र्य खराब आहे. तसेच ते माझ्या मुलीचे अपहरण करून तिला कुंटणखाण्यात विकणार असल्याची व पतीचे त्यांच्या सख्ख्या अपंग बहिणीशी संबंध असल्याची तक्रार पत्नीने न्यायालयात केली होती. यावेळी पतीने मुलीला न्यायालयापुढे हजर करून सत्यता न्यायालयासमोर मांडली. मी व माझी पत्नी दोघेही कामावर असल्याने मुलीच्या संगोपनासाठी आपण बहिणीला घरी आणल्याचे त्यांनी पुराव्यासह न्यायालयास सांगितले. न्यायालयात मुलीची जबानी घेण्यात आली होती. या प्रकरणात त्या पतीच्या बाजुने अँड. प्रदिप बावस्कर यांनी युक्तिवाद केला व प्रकरणातील सत्यता न्यायालयापुढे मांडली.