कल्याण : 9 ऑगस्ट क्रांती दिनानिमित्त कल्याण काँग्रेसच्या वतीने डोंबिवलीत गौरव पदयात्रा काढण्यात आली. दिवसेंदिवस वाढत असलेली महागाई, बेरोजगारी, नोटबंदी, GST, महिलांची असुरक्षितता,देशाच्या सुरक्षितेत खेळण्याचे काम,पेट्रोल डिझेल गॅस दरवाढ,जीवनावश्यक वस्तूंवर वाढवलेला GST,देशाचा घसरलेला जीडीपी तसेच लोकशाही संपवण्याचे काम भाजप सरकारने  गेल्या 8 वर्षात करत आहे याचा निषेध या आजादी गौरव पदयात्रेतून करण्यात आला.

डोंबिवली पश्चिम महात्मा गांधी पुतळा येथून सकाळी 10:00 वा.आजादी गौरव पदयात्रेची सुरुवात करण्यात आली. पदयात्रेच्या माध्यमातून काँग्रेस नेत्यांनी स्वातंत्र्यापूर्वी केलेला संघर्ष बलिदान आणि स्वातंत्र्यानंतर देशासाठी केलेली कामे, देशाचा केलेला विकास, देशाची केलेले प्रगतीचा, देशासाठी केलेला बलिदानाचा संदेश सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचवण्यात आला आणि 2014 पासून आलेल्या केंद्रातील भाजप सरकारच्या चुकीच्या निर्णयामुळे आणि धोरणामुळे काँग्रेसने देशासाठी जे कमावलं होतं ते देशाची मालमत्ता विकून  गमविण्याचे काम 8 वर्षाच्या काळात केंद्रातील भाजप सरकारने केलं आहे.तसेच 

जाती आणि धर्मात   तेढ निर्माण करून देश तोडण्याचे काम मोदी सरकार सातत्याने करत आहे म्हणूनच या देशाला जोडण्याचे काम आमचे सन्माननीय नेते राहुलजी गांधी  यांचा संदेश भारत जोडो अभियाना अंतर्गत करत आहे.याच अनुषंगाने भारत जोडो अभियाना अंतर्गत एकतेचा आणि समतेचा संदेश देण्यासाठी आजादी गौरव पद यात्रेच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोचोविण्यासाठी कल्याण डोंबिवली  जिल्हाध्यक्ष.सचिन दत्तात्रय पोटे  यांच्या नेतृत्वाखाली पदयात्रा निघाली. यावेळी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सचिव .संतोष केणे, कल्याण डोंबिवली शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे कार्याध्यक्ष जितेंद्र भोईर, माजी गटनेते नंदू म्हात्रे, माजी नगरसेवक नवीन सिंग, माजी नगरसेवक पप्पू भोईर, माजी नगरसेविका शारदा पाटील, जिल्हा उपाध्यक्ष सुरेखा ठाकूर, B ब्लॉक अध्यक्ष शकील खान, ब्लॉक अध्यक्ष एकनाथ म्हात्रे, गणेश चौधरी,अजय पोळकर,शकील खान,प्रवीण साळवे,राजेश वाघमारे आणि पॉली जेकब असे अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!