कल्याण दि.30 जुलै : कल्याण डोंबिवली महापालिकेची निवडणूक येऊ घातली आहे त्यामुळे राजकीय पक्षाच्या नेते मंडळींची कल्याण डोंबिवली वारी सुरू झालीय. गेल्या 2 वर्षापासून सक्रिय राजकारणापासून लांब असलेले भाजपचे राष्ट्रीय सचिव आणि माजी शिक्षण मंत्री विनोद तावडे आज कल्याणात कार्यकर्ता मेळाव्यासाठी आले होते, आपल्याला निवडणुकीला उतरवले का ? असा प्रश्न पत्रकारांनी त्यांना विचारला. त्यावेळी तावडे म्हणाले की, आगामी निवडणुकी करता  उतरवल्याचा कोणताही विषय नाही. गेल्या 2 वर्षांपासून आपल्यावर पक्षाने हरियाणाची जबाबदारी सोपवल्याने साहजिकच आपले बऱ्यापैकी तिकडे जाणे होते. तर 10 दिवस आपण महाराष्ट्रात फिरत असतो, आणि महाराष्ट्रातील आपला प्रवास यापूढेही असणार आहे सूचक  उत्तर दिले. तर गेल्या अनेक महिन्यांपासून महाराष्ट्राच्या राजकारण सक्रीय दिसत नसल्याबद्दल त्यांच्याकडे विचारणा केली असता त्यांनी या प्रश्नावर कोणतेही भाष्य केले नाही. प्रश्नाला बगल देत मौन बाळगले. 

भाजप मनसे युतीवर भाष्य ..
कल्याण पूर्वेतील भाजपच्या कार्यकर्ता मेळाव्यानंतरप्रसिद्धी माध्यमांशी बोलताना त्यांनी हे सूचक विधान केले.तर भाजप मनसे युतीच्या चर्चेबाबत बोलताना त्यांनी सांगितले की सहजच कोणी कोणाची भेट आणि चर्चा झाली म्हणून पतंग उडवण्यात मजा नाही. प्रत्येकाला आप आपला पक्ष वाढवण्याचा अधिकार असून अशा प्रकारच्या सर्व कल्पना खऱ्या नसतात असे मतही त्यांनी भाजप मनसे युतीवर व्यक्त केले. 
——-

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!