चेन स्नॅचिंग प्रकरणात ५ इराणी गजाआड : कल्याणच्या अॅन्टी रॉबरी स्कॉडची करवाई
आकाश गायकवाड
कल्याण : कल्याण परिमंडळ ३ च्या अॅन्टी रॉबरी स्कॉडने चेन स्नॅचिंग व मोटारसायकल चोरी प्रकरणात ५ इराणींना अटक करण्यात येत यश मिळवलं. त्यात दोन महिलांचा समावेश आहे. हुसेनी उर्फ गजनी मुक्तार इराणी, फातिमा संजय इराणी, मुस्तफा उर्फ मुसू संजय सययद, फराह हफीज खान, अलीहसन जाफरी इराणी अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.
कल्याण डोंबिवली परिसरात गेल्या काही महिन्यांपासून धूम स्टाईलने पादचाऱ्यांकडील सोन्याचे दागिने, मोबाईल, पार्क केलेल्या दुचाकी चोरीच्या घटना वाढल्याने महिलावर्ग आणि नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते. वाढत्या चोऱ्याच्या प्रकारामुळे चोरांनी पोलिसांपुढं आव्हान उभ केलं होत. या पार्श्वभूमीवर कल्याण परिमंडळ ३ चे उपायुक्त डॉ. संजय शिंदे यांनी आरोपींवर तातडीने कारवाई करण्याचे आदेश दिले होते त्यानुसार अॅन्टी रॉबरी स्कॉडचे पोलीस निरीक्षक श्रीकांत धरणे, पोलीस उपनिरीक्षक हेमंत ढेाले अविनाश पाळदे व त्यांच्या पथकाने सापळा रचून वेगवेगळया ठिकाणांहून आरोपींना अटक केली. त्यांच्याकडून सोनसाखळी चोरीचे १० आणि मोटारसायकल चोरीचे ४ गुन्हे उघडकीस आले आहेत. आरोपींची चौकशी सुरू असून त्याच्यांकडून अजून काही गुन्ह्यांची उघडकीस येण्याची शक्यता उपायुक्त शिंदे यांनी पत्रकार परिषदेत सांगितली.