ठाणे : राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी आज ठाणे महापालिका सहाय्यक आयुक्त कल्पिता पिंपळे यांच्याशी दूरध्वनीवरून संवाद साधला. त्यावेळी पिंपळे यांनी मुख्यमंत्रयाना एक विनंती केली. जे आरोपी आहेत त्यांना शासन झालं पाहिजे, त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी तुम्ही चिंता करू नका, लवकर बरे व्हा, हल्लेखोरांना कडक शासन होईल अशा शब्दात पिंपळेना धीर दिला.

काही दिवसांपूर्वीच अनधिकृत फेरीवाल्यांवर कारवाईसाठी गेलेल्या कल्पिता पिंपळे यांच्यावर फेरीवाल्यांनी प्राणघातक हल्ला केला. या हल्ल्यात कल्पिता पिपळेंची दोन बोटं छाटली गेली. तर, त्यांच्या अंगरक्षकाने एक बोट गमावले आहे.डॉक्टरांनी त्यांच्या बोटांवर यशस्वीपणे शस्त्रक्रिया केली, सध्या पिंपळे यांच्यावर ज्युपिटर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी फोन करुन पिंपळेंच्या तब्येतीची विचारपूस केली. महापौरांच्या फोनवरुन मुख्यमंत्र्यांनी पिंपळे यांच्याशी संवाद साधला, यावेळी त्यांनी, ‘तुमचं कोणत्या शब्दांत कौतुक करावं. मी तुम्हाला शब्द देतो की तुम्ही बरे झाल्यानंतर कारवाई करणार म्हणत आहात. पण आता ती जबाबदारी आमच्या सर्वांची आहे. तुम्ही चिंता करु नका, लवकर ठणठणीत बरे व्हा, असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं आहे. त्यावेळी पिंपळे यांनी आरोपींना कठोर शासन झाले पाहिजे अशी विनंती मुख्यमंत्रयाकडे केली त्यावेळी मुख्यमंत्रयानी हल्ला करणा-यावर कारवाई होणारचं अस आश्वासन दिलं. यावेळी महापौर नरेश म्हस्के आणि पालिका आयुक्त डॉ विपिन शर्मा उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *