काकोळे गावातील पाणी समस्या सोडविण्यासाठी 20 लाखांचा निधी देणार

आमदार गणपत गायकवाड यांचे आश्वासन 

अंबरनाथ :- काकोळे गावातील वर्षानुवर्षे असलेल्या पाणी समस्येवर तोडगा काढण्यासाठी 20 लाखांचा निधी पुरविणार असल्याचे आश्वासन कल्याण ग्रामिण विधानसभेचे आमदार गणपत गायकवाड यांनी आज दिले. काकोळे गावातील समस्यांचा आढावा घेण्यासाठी आमदार गणपत गायकवाड यांनी शुक्रवारी गावात पाहणी दौरा केला त्यावेळी ते बोलत होते. काकोळे गावाची समस्या गंभीर असून तातडीने निधी पुरवून पाणी समस्या मिटवली जाईल असे यावेळी ते म्हणाले. यावेळी उपस्थित एमआयडीसी अधिका-यांना त्यांनी धारेवर धरत गळती असलेल्या पाण्याचे पाईप त्वरीत बदलण्यात यावेत असे आदेशही त्यांनी यावेळी दिले.
काकोळे गावातील समस्येबाबत शिवनलिनी प्रतिष्ठानच्या महिला व गावक-यांनी गुरवारी आमदारांना लेखी निवेदन दिले होते, त्या अनुषंगाने त्यांनी पाहणी दौरा केला. यावेळी शिवनलिनी प्रतिष्ठानचे महाव्यवस्थापक अनिरूद्ध कुलकर्णी, प्रतिष्ठानचे अंबरनाथ अध्यक्ष नरेश गायकर, डोंबिवली अध्यक्ष अमोल काकडे, एमआयडीसी अधिकारी, ग्रामसेवक, सरपंच व गावकरी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *