काकोळे गावातील पाणी प्रश्न सोडविण्यासाठी आमदारांना साकडं 

अंबरनाथ : काकोळे गावातील पाणी प्रश्न सोडविण्यासाठी आज कल्याण पूर्वचे आमदार गणपत गायकवाड यांची भेट घेऊन त्यांना  निवेदन सादर करण्यात आले. यावेळी ज्येष्ठ विधीतज्ञ ऍड  प्रदिप बावस्कर, शिवनलिनी संघटनेचे अध्यक्ष अनिरुध्द कुलकर्णी , स्थानिक  गावकरी नरेश गायकर आदी उपस्थित होते. काकोळ गावात पाणी समस्येमुळे नागरिक त्रस्त झाले आहे. पाणी समस्येवर आवाज उठवल्याने स्थानिक रहिवाशी नरेश गायकर याना काहींनी धमकवल्याचा प्रकार घडलाय. शिवनलिनी संघटनेने गायकर यांच्या पाठीशी उभे राहून पाणी समस्या सोडविण्याचे आश्वासन दिले आहे. त्याच पार्श्वभूमीवर आमदार गायकवाड यांची भेट घेण्यात आली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *