K Kavita was interrogated for 9 hours by ED
उत्पादन शुल्क घोटाळा व मनी लाँड्रिग प्रकरणी कारवाई

नवी दिल्ली : तेलंगणाचे मुख्यमंत्री आणि बीआरएस नेते के. चंद्रशेखर राव यांच्या कन्या आमदार के. कविता यांनी शनिवारी अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) 9 तास चौकशी केली. दिल्लीच्या उत्पादन शुल्क धोरणातील अनियमिततेशी संबंधित मनी लॉन्ड्रिंग प्रकरणाच्या चौकशीसाठी दिल्लीला बोलवण्यात आले होते. आता 16 मार्च रोजी त्यांनी पुन्हा चौकशी होणार आहे.

कन्या के. कविता शनिवारी सकाळी 11 वाजता दिल्लीतील ईडी कार्यालयात पोहचल्यात.  कार्यालयात दिल्ली पोलीस आणि केंद्रीय निमलष्करी दलाचे जवान मोठ्या संख्येने तैनात करण्यात आले होते.

एपीजे अब्दुल कलाम रोडवर भारत राज्य समितीच्या (बीआरएस) कार्यकर्त्यांनी निदर्शने केली. चौकशी केल्यानंतर कविता रात्री 8 वाजता ईडी कार्यालयातून बाहेर पडल्या. ईडीने कविता यांना 16 मार्च रोजी पुन्हा हजर राहण्याचे समन्स बजावले आहे.

यापूर्वी ईडीने कविता यांना 9 मार्च रोजी हजर राहण्यास सांगितले होते. परंतु, संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात दीर्घकाळ प्रलंबित महिला आरक्षण विधेयक मंजूर करण्याच्या मागणीसाठी पूर्वनियोजीत वेळापत्रकानुसार शुक्रवारी दिल्लीतील उपोषणात सहभागी होण्याचे कारण सांगून वेळ मागून घेतला होता. त्यानुसार कविता शनिवारी ईडी कार्यालयात पोहचल्या.

यावेळी ईडीने प्रिव्हेन्शन ऑफ मनी लाँडरिंग अॅक्ट (पीएमएलए) अंतर्गत कविताचे जबाब नोंदवून घेतले. तसेच त्यांचा मोबाईल फोन स्कॅन केला. यावेळी बीआरएसचे आमदार, कार्यकर्ते आणि समर्थकांनी दिल्लीतील ईडी कार्यालयाबाहेर घोषणाबाजी केली. तसेच कविता यांच्याबद्दल अपमानास्पद वक्तव्य केल्याबद्दल तेलंगणाचे भाजपाध्यक्ष बंदी संजय यांचा पुतळा जाळून निषेध नोंदवला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!