मुंबई : जलसंपदा मंत्री जयंत पाटील आणि विरोधी पक्षनेते देवंद्र फडणवीस यांनी एकाच कारमधून प्रवास केल्याने चर्चांना उधाण आलय. गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजप कार्यकर्ते आमने सामने आले असतानाच, नेतेमंडळीची एकाच गाडीतून हमसफर दिसून आल्याने कार्यकर्ते आश्चर्य चकित झाले आहेत. या घडामोंडीमुळे राजकीय चर्चा रंगू लागल्या आहेत. तर दुसरीकडे एकिकडे कार्यकर्ते एकमेकांशी लढतात आणि नेते एकत्र गाडीतून फिरतात अशीही प्रतिक्रिया उमटू लागली आहे.
ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी आणि सहकार महर्षी पी. के. अण्णा पाटील यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचा लोकार्पण सोहळा आज शहादा येथे संपन्न झाला. या कार्यक्रमाप्रसंगी पाटील- फडणवीस हे एकाच कारने कार्यक्रम स्थळी उपस्थित राहिले. सत्ताधारी आणि विरोधक एकाच कारने प्रवास केल्योन राजकीय चर्चांना उधाण आलं. त्यातच जयंत पाटील यांच्या वक्तव्याने त्याला चांगलीच फोडणी मिळाली. एक काळ असा होता महाराष्ट्रातल सगळे नवे प्रयोग शहाद्यात व्हायचे असे वक्तव्य केलय. विरोधी पक्षनेते देवेंद फडणवीस म्हणाले की, आज मी आणि जयंत पाटील एकाच व्यासपीठावर आलो किंवा एका गाडीत दिसलो त्याचा वेगळा अर्थ घेऊ नये. राजकारण हा फार सिरीयस बिझनेस आहे. कुणी काय बोलले यावर लगेच अंदाज बांधू नये’, असं उत्तर फडणवीस यांनी दिलंय.
काही दिवसांपूर्वीच विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी राष्ट्रवादी विषयी वादग्रस्त वक्तव्य केल्यानंतर भाजप विरूध्द राष्ट्रवादी असा सामना रंगला होता. महिलांविषयी आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या प्रविण दरेकर यांनी माफी मागावी, अशी मागणी राष्ट्रवादीने केली आहे. महिलांची माफी मागा अन्यथा आम्हीही महिलांचा अपमान करणाऱ्यांचे थोबाड आणि गाल रंगवू शकतो,’ असा इशारा राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी दिला हेाता. पुण्यात राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या वतीनं प्रवीण दरेकरांविरोधात जोडे मारो आंदोलन करण्यात आलं होतं. तर गेल्या काही दिवसांपासून ईडी प्रकरणावरून राष्ट्रवादीच्या नेत्यांनी भाजपवर हल्ला करीत आहेत. तर भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांच्या टार्गेटवर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे नेहमीच असतात. त्यामुळे राष्ट्रवादी विरूध्द भाजप असा सामना अनेक दिवसांपासून सुरू असतानाही जयंत पाटील आणि देवेंद्र फडणवीस यांचा एकाच गाडीतून प्रवासावरून राजकीय चर्चा रंगल्या आहेत.