मुंबई दि. 30: संत्रे कुटुंबाला केलेली मारहाण म्हणजे  सत्तेचा माज आहे. गरीब कुटुंब आहे म्हणून त्रास देता पण या संत्रे कुटुंबाला न्याय देण्यासाठी आम्ही प्रयत्न करू विधान सभेत आवाज उठवू, असा इशारा विधानसभा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी दिला. जवखेडा गावात, केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे आणि आमदार संतोष दानवे यांच्या कार्यकर्त्यांनी मारहाण करून घर उध्वस्त केल्याचा गंभीर आरोप संत्रे कुटुंबियानी केला आहे. त्याची चौकशी ची मागणी वडेट्टीवार यांनी केली

 वडेट्टीवार म्हणाले की, जवखेडा गावातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 753, एम.साठी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे आणि आमदार संतोष दानवे यांच्या कार्यकर्त्यांनी कुंभार समाजाच्या संत्रे कुटुंबाला मारहाण केली. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना हाताशी धरून नियमबाह्य पद्धतीने घर उध्वस्थ केले असा आरोप पीडित संत्रे कुटूंबानी केला आहे. अज्ञात आठ ते दहा जणांनानी रात्रीच्या सुमारास घरात घुसून मारहाण करत घर उद्ध्वस्त केल्याची घटना केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांच्या गावात घडली आहे. जवखेडा गावातील कुंभार समाजाच्या संत्रे कुटुंबियांनी सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल करून न्याय मिळावा मागणी केली आहे. या प्रकारणी हसनाबाद पोलिस ठाण्यात लेखी तक्रार दाखल केली आहे .या तक्रारीच्या आधारे हसनाबाद पोलिसांनी आज्ञात आठ ते दहाजणा विरुद्ध संत्रे कुटूंबियांना मारहाण करून त्यांचं घर उध्वस्त केल्या प्रकरणी रात्री उशिरा गुन्हा दाखल केला आहे. परंतु हा तपास समाधानकारक नाही. या कुटुंबाला काही झालं तर रावसाहेब दानवे आणि त्यांचे कुटुंब याला जबाबदार ठरेल. संत्रे कुटुंबाने दानवे यांचे नाव घेतले आहे. त्यांच्यावर गुन्हा दखल करून चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी  वडेट्टीवार यांनी केली आहे.

*****

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!