जळगाव : अखिल भारतीय विद्यार्थी परिषद जळगाव महानगराची नूतन कार्यकारणी घोषणा करण्यात आली. याप्रसंगी महानगर अध्यक्ष म्हणून प्रा. डॉ अमरदीप पाटील तर महानगर मंत्री म्हणून मयूर माळी यांची नियुक्ती करण्यात आली.प्रसंगी मंचावर प्रमुख उपस्थिती म्हणून देवगिरी प्रदेश संघटन मंत्री श्री सिध्देश्वर लटपटे,निर्वाचन अधिकारी म्हणून प्रा.डॉ भूषण राजपूत तर महानगर अध्यक्ष प्रा.डॉ अमरदीप पाटील आणि महानगर मंत्री मयूर माळी उपस्थित होते.

अभाविप नेहमीच विद्यार्थ्यांच्या न्याय हक्कासाठी झटणारी व राष्ट्रीय पुनर्निर्मानाच्या व्यापक संकल्पनेत कार्य करणारी जगातील सर्वात मोठी एकमेव संघटना आहे.विद्यार्थ्यांच्या अनेक समस्या सोडवण्यासाठी व विद्यार्थी हिता साठी अभविप प्रत्येक वर्षी नवीन कार्यकारणी घोषणा करीत असते. त्याच अनुषंगाने आज नूतन महाविद्यालयातील बोस सभागृहात अभाविप जळगाव महानगराची नूतन कार्यकारणी घोषीत करण्यात आली. यात महानगर सहमंत्री म्हणून भाविन पाटील,रेणुका जाधव आणि श्रावणी आवरगंड तर डॉ बाबासाहेब आंबेडकर नगर मंत्री म्हणून चिन्मय महाजन, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ नगर मंत्री ऋषिकेश बारी तर छत्रपती श्री शिवाजी महाराज नगर मंत्री म्हणून गुणवंत बोरसे यांची नियुक्ती करण्यात आली.

प्रसंगी प्रदेश संघटन मंत्री सिद्धेश्वरजी लटपटे यांनी परिषद मांडणी करीत जमलेल्या छात्रशक्तीला उद्बोधन केले. तसेच महानगर मंत्री मयूर माळी यांनी विद्यार्थ्यांसमोर आगामी दिशा मांडली व अधिक संख्येने व उत्साहाने विद्यार्थ्यांनी विद्यार्थी परिषदेचे कार्य करावे असे आव्हान जमलेल्या छात्रशक्तीस केले.तसेच कार्यक्रमाचे सूत्र संचलन रेणुका जाधव यांनी केले तर भाविन पाटील यांनी आभार प्रदर्शन करीत कार्यक्रमाचा समारोप केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!