डोंबिवलीत प्रथमच बालसाहित्य संमेलन आणि आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे आयोजन !
जान्हवी मल्टी फाउंडेशनतर्फे ७ जानेवारीपासून ते १२ जानेवारीपर्यंत विविध कार्यक्रम
डोंबिवली : येथील जान्हवी मल्टी फाउंडेशनतर्फे ७जानेवारीपासून ते १२ जानेवारीपर्यंत हे विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून डोंबिवलीत प्रथम बालसाहित्य संमेलन आणि आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे आयोजन करण्यात आलं आहे अशी माहिती जान्हवी मल्टी फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष राजकुमार कोल्हे यांनी दिली.
७ जानेवारीला जन गण मन शाळेतील पूर्व प्राथमिक विभागातील शालेय विध्यार्थ्यांचे सांस्कृतीक कार्यक्रम होणार आहे. ८ जानेवारीला माध्यमिक व उच्च माध्यमिक विभागातील विध्यार्थ्यांचे सांस्कृतीक कार्यक्रम तर 9९ जानेवारीला वंदे मातरम विद्यालयाचे आंतर महाविद्यालयीन सांस्कृतिक कार्यक्रम तर १० जानेवारीला डोंबिवलीत प्रथमच कल्याण डोंबिवली महापालिका अंतर्गत येणाऱ्या माध्यमिक शाळेतील विद्यार्थ्यांकरिता बालसाहित्य संमेलन होणार आहे. तसेच बी के मृत्युंजयजी इंटर नॅशनल प्रवक्ते व अमेरीकेचे राजदूत केनेथ जस्टर यांना एम एफ राष्ट्रज्योत पुरस्कार २०१९ ने सन्मानित करण्यात येणार आहे. ११ व १२ जानेवारीला आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव होणार आहे. जान्हवी कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाची सुरूवात केली जाणार आहे. या महोत्सवात १०० समकालीन सिनेमा, डॉक्युमेंटरी सिनेमा तसेच विविध प्रादेशिक भाषांचे लघू चित्रपट तसेच इंग्रजी उपशीर्षकांसहित बहुभाषिक चित्रपटांचा समावेश करण्यात येणार आहे. शहरातील कला दिग्दर्शकांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी नव्याने या क्षेत्रात पाऊल टाकणा-या विद्याथ्यांना या महोत्सवात समावेश करण्यात येणार आहे. कल्याण डोंबिवली शहरामध्ये मुंबई विद्यापीठ अंतर्गत वंदे मातरम महाविद्यालयात फिल्म टेल्हीवीजन या शाखेचे शिक्षण देणारे एकमेव महाविद्यालय आहे. भविष्यात विद्याथ्यांना चित्रपट क्षेत्रात फायदा होईल त्याच हेतूने या महोत्सवाचे आयोजन करण्यात आल्याचे कोल्हे यांनी सांगितले.