२७ गावांची स्वतंत्र नगरपालिका करण्यासाठी कॉंग्रेसचाही पुढाकार… आज मंत्रालयात बैठक !
भाजप सरकारच्या काळात २७ गावावर झालेला अन्याय महाविकास आघाडी दूर करेल – संतोष केणे यांना विश्वास
डोंबिवली : कल्याण डोंबिवली महापालिकेतून २७ गावे वगळण्याचे आश्वासन तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले होते. मात्र भाजप सरकारच्या काळात २७ गावावर जो अन्याय झाला तो आता महाविकास आघाडीच्या काळात दूर होईल आणि २७ गावांची वेगळी नगरपालिका बनेल असा विश्वास महाराष्ट्र कॉंग्रेस प्रदेश सचिव आणि आगरी कोळी भूमीपूत्र महासंघाचे नेते संतोष केणे यांनी व्यकत केला. २७ गावांची स्वतंत्र नगरपालिका करून भूमीपुत्रांना न्याय द्यावा अशी मागणी संतोष केणे यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, विधानसभा अध्यक्ष नानासाहेब पटोले आणि नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली होती. त्यानुसारच शुक्रवारी नगरविकास मंत्री शिंदे यांच्या दालनात बैठकीचे आयोजन करण्यात आले असून, कल्याण डोंबिवलीतील लोकप्रतिनिधींना या बैठकीला आमंत्रीत करण्यात आले आहे. त्यामुळे या बैठकीत काय निर्णय होतो याकडे सर्वांचे लक्ष वेधेल आहे
कल्याण डोंबिवली महापालिकेतून २७ गावे वगळण्या करीता भूमीपुत्र व संघर्ष समिती गेले ५ वर्ष लढा देत आहे.त्याच लढ्याला आता यश येताना दिसत आहे. पालकमंत्री एकनाथ शिंदे बैठक घेणार आहेत या बैठकीला कॉंग्रेसचे प्रदेश सचिव संतोष केणे याना विशेष निमंत्रित करण्यात आले आहे. तसेच कल्याण डोंबिवली शहरातील सर्वच आमदार खासदार आदी लोकप्रतिनिधींनाही आमंत्रित करण्यात आले आहे संतोष केणे यांनी ५ फेब्रुवारी रोजी या संदर्भातील एक पत्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे याना दिले होते त्याची दखल घेत पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी खासदार,आमदार,संघर्ष समिती सह काँग्रेसचे संतोष केणे यांनाही बैठकीसाठी बोलाविले आहे. कॉंग्रेसचे प्रतिनिधी म्हणून केणे हे २७ गावांची भूमिका मांडणार आहेत.त्यामुळे केणे यांच्या उपस्थितीला एक वेगळे महत्व आले आहे. भाजप सरकारच्या काळात २७ गावातील १० गावांवर ग्रोथ सेंटर आणि भाल गावातील 523 एकर जागेवर, 210 एकरवर प्रांतिक सरकार आणि 250 एकरवर डम्पिंगचा आरक्षण टाकण्यात आल आहे. नेवाळी आंदोलनात भूमीपुत्रांवर गोळीबार करण्यात आला त्यामुळे गावकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी आहे. तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही 27 गावे वगळून स्वतंत्र नगरपालिका करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र पाच वर्षात भाजपने कोणताच निर्णय घेतला नाही. त्यामुळे गावकर्यांनाध्ये नाराजीचा सूर आहे. महाविकास आघाडी ही भूमीपुत्रांच्या बाजूने असून त्यांना न्याय मिळेल अशी अपेक्षा केणे यांनी व्यक्त केली आहे
—-