आंतरराष्ट्रीय मॉडेलिंग स्पर्धेत डोंबिवलीचा झेंडा फडकला : जय गायकवाड ची बाजी

डोंबिवली (प्रतिनिधी) : आंतरराष्ट्रीय मॉडेलिंग स्पर्धेत डोंबिवलीचा जय गायकवाड याने बाजी मारली आहे. मिस्टर इंडिया इंटरनॅशनल फस्ट रन्नरअप हा मानाचा चषक  पटकावून, डोंबिवलीचा झेंडा  आंतरराष्ट्रीय पातळीवर फडकवला आहे. बॉलीवूडचा अभिनेता अरबाज खान, अभिनेत्री जॉर्जजिया  यांच्या हस्ते जय चा सन्मान करण्यात आला आहे. या स्पर्धेसाठी महाराष्ट्रातून तो एकमेव स्पर्धेक सहभागी झाला होता.

जिओ किंग अॅण्ड क्वीन मिस्टर इंडिया इंटरनॅशनल ही मॉडेलिंग स्पर्धेचा ग्रॅण्ड फिनाले नुकताच कलकत्ता येथे पार पडला. या स्पर्धेत डोंबिवलीकर जय गायकवाड याने मिस्टर कॅटेगरीत बाजी मारून मिस्टर इंडिया इंटरनॅशनल फस्ट रन्नरअप हा मानाचा चषक पटकाविला आहे. या स्पर्धेसाठी ऑनलाइन मानांकन मागविण्यात आली होती. त्यानंतर चार महिन्यांपूर्वी या स्पर्धेसाठी मुंबई येथे ऑडीशन घेण्यात आली होती.  इंट्रोडक्शन, टॅलेंट राऊंड आणि प्रश्न- उत्तर अशा तीन स्तरावर ही ऑडीशन पार पडली. त्या निवड चाचणीतून स्पर्धेक निवडण्यात आले होते. या स्पर्धेसाठी दुबई, कलकत्ता, जयपूर, बंग्लोर, ओडीसा, अहमदाबाद, केरळ आदी परिसरातील ४० स्पर्धक निवडण्यात आले. त्यातील ३२ स्पर्धेक हे सेमीफायनलसाठी सिलेक्ट झाले होेते.  दुबई येथे सेमीफायनल पार पडली. त्यानंतर कलकत्ता येथे ग्रॅणड फिनेल झाला. जय ने अरेबीक डान्स राऊंड , शेबरवानी इंडिया क्लचल रॅमवॉक,  फॉरमर राऊंड आणि बुध्दीमत्ता चाचणी पार पडली. यामध्ये जय ने बाजी मारली आहे. यावेळी बॉलीवूड, टॉलीवूडचे अभिनेते गायक कलाकारांची उपस्थिती होती. जय हा डोंबिवली पश्चिमेतील एलोरा सोसायटीत राहतो. सर्वसामान्य कुटूंबातील जय हा सध्या जीममध्ये ट्रेनर म्हणून काम करतो. त्याला डान्स आणि  मॉडेलिंग क्षेत्राची  खूप आवड आहे. मात्र माॅडेलिंग स्पर्धेसंदर्भात त्याला नातेवाईकांकडून माहिती मिळाली होती. त्या आधारे त्याने ऑनलाइन नामांकन सादर केल्यानंतर तो सिलेक्ट झाला होता. विशेष म्हणजे मॉडेलिंग स्पर्धे त्याने पाहिल्यांदाच सहभाग घेऊन चषक पटकावित डोंबिवलीचा झेंडा फडकाविला  आहे. मॉडेलिंग स्पर्धेबरोबरच रॅम्प वॉक, सुंदरता आणि बुध्दीमत्ता चाचणी यावर त्याची निवड झाली आहे.  त्याच्या या यशाचे सर्वत्रच कौतूक होत आहे.
—————–

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!