ठाणे : शहरामध्ये साथीचे आजार उद्भवू नयेत यासाठी महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांनी प्रत्येक प्रभाग समितीतंर्गत धूर, औषध फवारणी करण्याचे आदेश दिल्यानंतर विविध ठिकाणी व्यापक प्रमाणात धूर, औषध फवारणी सुरु आहे. दरम्यान पाण्यामुळे साथीचे आजार पसरू नये यासाठी प्रत्यक्ष घरी जावून पाण्याची तपासणी करण्यात येत आहे.

ठाणे महानगरपालिका क्षेत्रामध्ये जुलै महिन्यामध्ये डेंग्युचे संशयित रुग्णसंख्या ५१ आणि निश्चित निदान केलेले शून्य रुग्णसंख्या आहे. तसेच मलेरियाचे जुलै २०२१ मध्ये फक्त ५४ रुग्ण आढळुन आले होते. आरोग्य विभागाच्यावतीने शहरात गृहभेटी देवून तपासणी करण्यात येत असून एकुण ४३,३४३ घरांची तपासणी करण्यात आली त्यापैकी ४,६८३ घरे दुषित आढळुन आली. तसेच एकुण ६२,१०३ कंटेनरची तपासणी केली असता त्यापैकी ४,९११ कंटेनर दूषित आढळुन आले. या सर्व दुषित कंटेनरमध्ये अळीनाशक टाकण्यात आले असून ९,७१ कंटेनर रिकामे करण्यात आले आहेत. दरम्यान कार्यक्षेत्रात ९० हॅण्डपंप, १० ट्रॅक्टर्स, ६ ईरिक्षा, ८ बोलेरो वाहनामार्फत दोन सत्रात १,७०९ ठिकाणी औषध फवारणी आणि ४० धूर फवारणी हॅण्डमशीनव्दारे १५,२९९ ठिकाणी धूर फवारणी करण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!