मनीष मार्केट परिसरातील अनधिकृत फेरीवाले पालिकेची कारवाई : ४ ट्रक माल केला जप्त
मुंबई : क्रॉफर्ड मार्केट जवळील मनीष मार्केट परिसरातील अनधिकृत फेरीवाले, अनधिकृतपणे उभारलेेले स्टॉल आणि शेडसवर गुरूवारी पालिकेने धडक कारवाई केली. या कारवाईत सुमारे ४ ट्रक सामान पालिकेने जप्त केले. या कारवाईमुळे मनीष मार्केट परिसरातील रस्ते आणि पदपथांनी मोकळा श्वास घेतला.
दक्षिण मुंबईतील महात्मा ज्योतीबा फुले मंडई (क्रॉफर्ड मार्केट) जवळील मनीष मार्केट, साबुसिद्दीक मार्ग, मुसाफिर खाना मार्ग इत्यादी परिसरातील अनधिकृत फेरीवाल्यांमुळे रस्त्यावर मोठया प्रमाणात वाहतूक केांडी होत असे. तसेच दुकानदारांनीही अनधिकृतपणे स्टॉल उभारून पदपथ अडवून धरले होते. महापालिकेच्या ‘ए’ विभागाने या परिसरातील ३४ अनधिकृत स्टॉल्ससह ४२ अनधिकृत शेड्सही तोडण्यात आले. परिमंडळ – १ चे उपायुक्त सुहास करवंदे यांच्या मार्गदर्शनानुसार ही कारवाई करण्यात आली. या परिसरात यापुढेही नियमितपणे कारवाई सुरू राहणार असल्याची माहिती ए विभागाचे सहाय्यक आयुक्त किरण दिघावकर यांनी दिली आहे.