विरार  : महागाईने सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले आहे. घरगुती गॅस च्या दरवाढीने महिला वर्ग घायकुतीला आले आहेत. त्यामुळे गरिबांच्या घरात पुन्हा चूल पेटण्याची वेळ आलीय. वाढत्या गॅस च्या दरवाढीच्या निषेधार्थ विद्यार्थी भारती आणि मराठी भारती च्या कार्यकर्त्यांनी गुदमरलेला  व कोंडलेला आवाज आणि सर्वसामान्य जनतेचा राग, चिड व्यक्त करणारे हाव भाव गरिबीची व्यथा सांगणारा बोलका सिलेंडर अशी कंदिलाची प्रतिकृती साकारून सरकारला जाब विचारीत गॅसचे वाढते दर कमी करण्याची मागणी केलीय. 

दरवर्षी वेगवेगळ्या सामाजिक विषयांच्या अनुषंगाने विरार विभागातील विद्यार्थी भारती व मराठी भारतीचे कार्यकर्ते तरुण कलाकार सचिन सुतार व राकेश सुतार आणि सुनीता सुतार ही भावंडं दिवाळीत कंदील बनवतात. यावर्षीही त्यांनी दिवाळीत कंदिलाच्या माध्यमातून  घरगूती गॅस सिलेंडरची प्रतिकृती साकारीत गॅस दर वाढीवर आवाज उठवला आहे.   वाढत्या गॅस वाढीमुळे  गरिबांच्या घरात पुन्हा चूल पेटवायची वेळ आलीये.सर्वसामान्य घरातील लोकांना पगारच 3000 असतो, त्यांनी 1200 रुपयांचा बाटला भरला तर त्याचे कुटुंब त्याने कसे जगवावे. सामान्य जनतेला न पडवणारी ही किंमत जीव घेणी आहे असे मत सचिन सुतार यांनी मांडले.


जनतेचा दबलेला आवाज आणखीन दाबण्याचा हा  निव्वळ डाव आहे  सर्वसामान्य जनतेला अश्या प्रकारे छळण्याचा या सरकारला कोणताच अधिकार नाही . दिवाळीत दिवे पेटवन लांब राहिलं साधं गॅस पेटवन कठीण झालंय.  किमान गोरगरिब जनतेला सुखाने खाता व जगता यावं.. यासाठी घरगुती गॅस सिलेंडर चे दर कमी  करावेत अशी विनंती मराठी भारतीचे राकेश सुतार यांनी केली आहे.


गुदमरलेला  व कोंडलेला आवाज आणि सर्वसामान्य जनतेचा राग, चिड व्यक्त करणारे हाव भाव गरिबीची व्यथा सांगणारा बोलका सिलेंडर..या प्रकारे कंदीलाची रचना केली आहे..अशी माहिती सुनीता सुतार यांनी दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!